पुण्यात अतिवेगाने वाढतेय श्रीमंतांची संख्या
By admin | Published: March 3, 2017 06:10 AM2017-03-03T06:10:49+5:302017-03-03T06:10:49+5:30
पुण्यातील श्रीमंतांची संख्या देशात सर्वाधिक १८ टक्क्यांनी वाढत असल्याचे ११ व्या संपत्ती अहवालात म्हटले आहे.
पुणे : पुण्यातील श्रीमंतांची संख्या देशात सर्वाधिक १८ टक्क्यांनी वाढत असल्याचे ११ व्या संपत्ती अहवालात म्हटले आहे. ज्यांची संपत्ती ३0 दशलक्ष डॉलरपेक्षा जास्त आहे, अशा श्रीमंतांची पुण्यातील संख्या येत्या दशकात १७0 टक्क्यांनी वाढणार आहे.
अल्ट्रा हाय नेट वर्थ इंडिविज्युअल (यूएचएनडब्ल्यूआय) म्हणजे अतिश्रीमंतांची माहिती ठेवणाऱ्या नाइट फ्रँक या संस्थेने हा अहवाल जारी केला आहे. ८९ देशांतील १२५ शहरांतील श्रीमंतांची माहिती अहवालात आहे. जगातील ९00 मोठ्या खासगी बँका आणि संपत्ती सल्लागाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे हा अहवाल तयार करण्यात आला. त्यानुसार सध्या पुण्यात १४0 अतिश्रीमंत आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यांची संख्या १८ टक्क्यांनी वाढली आहे. येत्या दहा वर्षांत पुण्यातील श्रीमंतांची संख्या वाढतच राहणार आहे.
नाइट फ्रँकचे मुख्य अर्थतज्ज्ञ आणि राष्ट्रीय संचालक डॉ. समंतक दास यांनी सांगितले की, पुण्याचे आता टेक्नॉलॉजी हबमध्ये वेगाने रूपांतर होत आहे. तसेच ते मुंबईपासून जवळ आहे. अनेक श्रीमंत व्यक्ती मुंबईऐवजी पुण्यात राहणे पसंत करतात. (लोकमत न्यूज नेटवर्क)
>मुंबई जगात २१ व्या स्थानी
अहवालातील माहितीनुसार, यंदा पुण्यात २१ अतिश्रीमंतांची भर पडली. भारतात दरवर्षी ५00 लोक या यादीत नव्याने समाविष्ट होतात. येत्या काही वर्षांत हा आकडा १ हजारवर जाईल. या यादीत टोरँटो, वॉशिंग्टन डीसी आणि मॉस्कोच्या पुढे असलेली मुंबई २१ व्या स्थानी आहे. बँकॉक, सिएटल आणि जकार्ता यांच्या पुढे असलेली दिल्ली ३५ व्या स्थानी आहे.
>30 दशलक्ष डॉलरपेक्षा
जास्त संपत्ती असलेल्या नागरिकांच्या जागतिक यादीत ६,३४0 लोक नव्याने दाखल झाले.
193490 लोक या यादीत आहेत. एक अब्ज डॉलर संपत्ती असलेल्या लोकांची संख्या २,0२४ झाली आहे.
क्रेडाईचे उपाध्यक्ष सतीश मगर यांनी सांगितले की, वस्तू उत्पादन, कृषी, शिक्षण, कोअर इंजिनीअरिंग, आणि आयटी यासारख्या अनेकविध पातळ्यांवर विकास झाल्यामुळे पुणे पुढे आले