परिचारिका जाणार संपावर
By admin | Published: July 25, 2014 12:49 AM2014-07-25T00:49:37+5:302014-07-25T00:49:37+5:30
विविध मागण्यांना घेऊन परिचारिकांनी फेबु्रवारी महिन्यात केलेल्या आंदोलनावर शासनाने समिती गठित केली होती. तीन महिन्यात या मागण्यांवर निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. या आश्वासनाला आता पाच
पाच महिने उलटूनही निर्णय नाही : विभागातील आठ हजार परिचारिकांचा निर्धार
नागपूर : विविध मागण्यांना घेऊन परिचारिकांनी फेबु्रवारी महिन्यात केलेल्या आंदोलनावर शासनाने समिती गठित केली होती. तीन महिन्यात या मागण्यांवर निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. या आश्वासनाला आता पाच महिने लोटूनही अद्याप एकाही मागणीवर चर्चा झाली नाही. याविरोधात राज्यातील परिचारिकांनी ५ आॅगस्टपासून आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र गव्हर्नमेंट विदर्भ नर्सेस फेडरेशनने दिला आहे.
परिचारिकांचा संप झाल्यास राज्यातील २३ हजार, विदर्भातील १६ हजार व नागपूर विभागातील ८ हजार परिचारिका आंदोलनात सहभागी होतील. परिणामी, आरोग्य व्यवस्थाच खिळखिळी होईल. काही दिवसांपूर्वी ग्रामीण डॉक्टरांनी पुकारलेला संप व ग्रामसेवकांनी केलेले आंदोलन शासनाने ‘हायजॅक’ केले.
आता परिचारिकांनी संपावर जाण्याचा इशारा दिल्याने शासनाची नव्याने डोकेदुखी वाढली आहे. आंदोलनात मेडिकलच्या ७८५, मेयोच्या ४८० तर डागा रुग्णालयाच्या १३८ परिचारिका संपावर जाण्याची शक्यता आहे.
याशिवाय राज्य शासनाच्या अंतर्गत येणाऱ्या ‘एनआरएचएम’, प्राथमिक आरोग्य केंद्रे, ईएसआय, वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सिव्हिल रुग्णालये आदी ठिकाणी कार्यरत परिचारिकाही आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती आहे.(प्रतिनिधी)