परिचारिका दिसणार आता बदामी रंगात
By admin | Published: October 26, 2016 03:29 AM2016-10-26T03:29:04+5:302016-10-26T03:29:04+5:30
परिचारिकांसाठी पांढऱ्या रंगाचा गणवेश नको, त्याऐवजी बदामी रंगाचा गणवेश असावा, अशी मागणी गेल्या कित्येक वर्षांपासून परिचारिकांची मागणी होती. मात्र, यात मतभिन्नता
मुंबई : परिचारिकांसाठी पांढऱ्या रंगाचा गणवेश नको, त्याऐवजी बदामी रंगाचा गणवेश असावा, अशी मागणी गेल्या कित्येक वर्षांपासून परिचारिकांची मागणी होती. मात्र, यात मतभिन्नता होती. अखेर परिचारिकांना न्याय मिळाला आहे. परिचारिकांच्या गणवेशाचा रंग बदलण्यात आला आहे. हा गणवेश आता बदामी रंगाचा असणार आहे. मंगळवारी शासनाच्या परिपत्रकाद्वारे ही माहीती देण्यात आली.
वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अखत्यारितील परिचर्या संवर्गातील व परिचर्या शैक्षणिक क्षेत्रातील वर्ग २, वर्ग ३ च्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी बदामी रंगाचा गणवेश निश्चित करण्यात आला आहे. २०१० पासून हा विषय प्रलंबित होता. यापुढे महिलांसाठी सलवार-कुर्ता किंवा साडी आणि ब्लाउज बदामी रंगाचा असणार असून, त्यावर पांढरा अॅप्रन असणार आहे, तर पुरुषांसाठी बदामी रंगाचा शर्ट आणि फूल पँट त्यावर पांढरा अॅप्रन असणार आहे. दोघांसाठी बदामी रंगाचे मोजे आणि काळ्या रंगाचे बूट अथवा सँडल, असा गणवेश निश्चित करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)