नर्सिंग अभ्यासक्रमाची पदे वगळली

By admin | Published: December 28, 2016 01:28 AM2016-12-28T01:28:39+5:302016-12-28T01:28:39+5:30

परिचर्या महाविद्यालयात नव्याने निर्माण करण्यात आलेल्या ४१ शैक्षणिक पदांपैकी पाठ्यनिर्देशक हे पद वगळून उर्वरित सर्व व रिक्त पदे तातडीने भरण्याची गरज असल्याने ती लोकसेवा

Nursing courses have been dropped | नर्सिंग अभ्यासक्रमाची पदे वगळली

नर्सिंग अभ्यासक्रमाची पदे वगळली

Next

मुंबई : परिचर्या महाविद्यालयात नव्याने निर्माण करण्यात आलेल्या ४१ शैक्षणिक पदांपैकी पाठ्यनिर्देशक हे पद वगळून उर्वरित सर्व व रिक्त पदे तातडीने भरण्याची गरज असल्याने ती लोकसेवा आयोगाच्या कक्षेतून एक वर्षासाठी वगळून त्यांच्या भरतीसाठी समिती स्थापन करण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
नवी दिल्ली येथील भारतीय परिचर्या परिषदेच्या सूचनेनुसार राज्य शासनाने वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागांतर्गत जनरल नर्सिंग व मिडवायफरी अभ्यासक्रमाच्या राज्यात कार्यरत असलेल्या १० शाळांपैकी दोन शाळांचे मिडवायफरीमधून परिचर्या महाविद्यालयात रुपांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार एका महाविद्यालयात ५० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे बी. एस्सी. (नर्सिंग) पदवी अभ्यासक्रम तसेच दुसऱ्या महाविद्यालयात ५० विद्यार्थी क्षमतेचे बी. एस्सी. (नर्सिंग) व २५ विद्यार्थी क्षमतेचे एम.एस्सी (नर्सिंग) हा पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्याबाबातचा त्यात समावेश आहे. परंतु भारतीय परिचर्या परिषदेनुसार आवश्यक शैक्षणिक संवगार्तील पदे मंजूर नसल्याने २०१४ मध्ये ४१ शैक्षणिक व ३ अशैक्षणिक पदे मंजूर करण्यात आली आहेत. यामध्ये प्राध्यापक आणि प्राचार्य (४), प्राध्यापक आणि उपप्राचार्य (५) सहयोगी प्राध्यापक (९), अधिव्याख्याता (१५), पाठ्यनेशक/ चिकित्सालयीन निर्देशक (८), वसतीगृह अधिक्षिका (३) या पदांचा समावेश आहे. प्राचार्य, प्राध्यापक नि उपप्राचार्य, सहयोगी प्राध्यापक, अधिव्याख्याता या मंजूर पदांसोबत मुंबईच्या परिचर्या शिक्षण संस्थेतील रिक्त पाच पदांसह एकूण ३८ पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेतून भरण्यासाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापण्याचा निर्णय घेण्यात आला. (प्रतिनिधी)

यापूर्वी पदविका अभ्यासक्रम शिकवित असलेल्या परंतु ज्यांच्याकडे एमस्सी (नर्सिंग) ही अर्हता असलेल्या ज्येष्ठतम पाठ्यनिर्देशकांनाच प्राचार्य, उपप्राचार्य, सहयोगी प्राध्यापक व अधिव्याख्याता या पदनामाने संबोधून त्यांच्याकडून अध्यापकाचे काम करून घेण्यात येत असे. मात्र, त्यांना अनुदेय वेतन मात्र दिले जात नाही. त्यामुळे या पदांची तातडीने नियुक्ती करण्यात यावी अशी भारतीय परिचर्या परिषदेकडून सूचना होती.

Web Title: Nursing courses have been dropped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.