ओ लाही..ओ लाही ! विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा : कमाल तापमान चाळीशी पार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2019 01:25 PM2019-03-28T13:25:01+5:302019-03-28T13:28:11+5:30
राज्यात बुधवारी सर्वाधिक कमाल तापमान मालेगाव येथे ४१. १ अंश तर, सर्वात कमी किमान तापमान अहमदनगर येथे १५. ५अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे़. हवेतील आर्द्रता कमी झाल्याने उष्णतेचे वितरण जमिनीलगत होत असल्याने उष्णतेत वाढ झाली आहे़.
पुणे : कोकण, गोव्याच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली असून मराठवाडा व विदर्भाच्या काही भागात मोठ्या प्रमाणावर कमाल तापमानात वाढ झाली आहे़. विदर्भाच्या काही भागात पुढील दोन दिवस उष्णतेची लाट येण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे़. राज्यात बुधवारी सर्वाधिक कमाल तापमान मालेगाव येथे ४१़६ अंश तर, सर्वात कमी किमान तापमान अहमदनगर येथे १५़५ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे़.
हवेतील आर्द्रता कमी झाल्याने उष्णतेचे वितरण जमिनीलगत होत असल्याने उष्णतेत वाढ झाली आहे़. कमाल व किमान तापमानात वाढ झाली आहे़. मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे़ मध्य महाराष्ट्रातील अनेक भागात कमाल तापमान सरासरीच्या तुलनेत २ ते ३ अंशाने वाढ झाली आहे़. किमान तापमानातही वाढ झाल्याचा परिणामी रात्रीही उष्ण वारे वाहताना जाणवत होते़ . मराठवाड्यात किमान तापमानात २ अंशाने वाढ झाली आहे़.
सध्या सौराष्ट्र, दक्षिण गुजरातचा किनारपट्टीचा भाग विदर्भात उष्णतेची लाट जाणवत असून पुढील दोन दिवस पश्चिम मध्य प्रदेश, विदर्भात उष्णतेची लाट राहणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे़.
२८ व २९ मार्च रोजी गोव्यासह संपूर्ण राज्यात हवमान कोरडे राहील़ ३० मार्च रोजी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे़ ३१ मार्च रोजी मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे़.
२८ व २९ मार्च रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे़.
......................
* राज्यातील कमाल व किमान तापमान (कंसात) (अंश सेल्सिअस) : पुणे ३९..७ (१८.६), लोहगाव ४० (२१.२), जळगाव ४१ (१८), कोल्हापूर ३७. ६ (२२.९), महाबळेश्वर ३४.७ (२०.१), मालेगाव ४१.६ (१९.६), नाशिक ३८.५(१७.४), सांगली ३८.५( २१.१), सातारा ३९.२ (२०.५), सोलापूर ४१.२ (२६.१), मुंबई ३१.७ (२४.२), सांताक्रुझ ३३.३ (२३.५), अलिबाग ३२.४ (२२.८), रत्नागिरी ३२.२ (२४.८), पणजी ३३ (२७.३), डहाणु ३३.१ (२३़.६), औरंगाबाद ४१.६(२०), परभणी ४१.६(१९.५), नांदेड ४१ (२३), बीड ४० (२०.६), अकोला ४१.१(२०.५), बुलढाणा ३७.४(२१.६), ब्रम्हपुरी ४०. ७ (२२.८), चंद्रपूर ४१. ४(२६.४), गोंदिया ३५. ४( १८..८), नागपूर ३९. १ (२२. २), वाशिम ४० (२१), वर्धा ४० (२४.५), यवतमाळ ४०. ५ (२३)