अरेरे किती हे दुर्दैव - परळच्या ऑफिसमधला शेवटचा दिवस ठरला शेवटचाच!

By darshana.tamboli | Published: September 29, 2017 04:33 PM2017-09-29T16:33:35+5:302017-09-29T17:15:02+5:30

जर नशीबात मृत्यू लिहिलेलाच असेल तर काळही येतो आणि वेळही याचा दुर्दैवी अनुभव आज मुंबईतल्या ट्रीसा पॉल कुटुंबियांना आला.

O mysterious - the last day of Parel's office was the last! | अरेरे किती हे दुर्दैव - परळच्या ऑफिसमधला शेवटचा दिवस ठरला शेवटचाच!

अरेरे किती हे दुर्दैव - परळच्या ऑफिसमधला शेवटचा दिवस ठरला शेवटचाच!

Next
ठळक मुद्दे जर नशीबात मृत्यू लिहिलेलाच असेल तर काळही येतो आणि वेळही याचा दुर्दैवी अनुभव आज मुंबईतल्या ट्रीसा पॉल कुटुंबियांना आला. फिनिक्स मिलमधल्या मॉलमध्ये असलेल्या ऑफिसमध्ये जाण्यासाठी एलफिन्स्टन स्टेशनवरून जाण्याचा ट्रीसा यांचा आजचा शेवटचा दिवस होता.

मुंबई - जर नशीबात मृत्यू लिहिलेलाच असेल तर काळही येतो आणि वेळही याचा दुर्दैवी अनुभव आज मुंबईतल्या ट्रीसा पॉल कुटुंबियांना आला. फिनिक्स मिलमधल्या मॉलमध्ये असलेल्या ऑफिसमध्ये जाण्यासाठी एलफिन्स्टन स्टेशनवरून जाण्याचा ट्रीसा यांचा आजचा शेवटचा दिवस होता. त्यांचं ऑफिस अंधेरीतील साकी नाका येथे शिफ्ट होत असल्याने पुढच्या आठवड्यापासून त्या अंधेरीला जाणार होत्या. आजचा एलफिन्स्टन स्थानकातून शेवटचा प्रवास करण्यासाठी त्या आल्या आणि दुर्दैवानं चेंगराचेंगरीच्या रुपानं काळानं त्यांच्यावर घाला घातला आणि ट्रीसा यांचा आयुष्याचाच हा शेवटचा दिवस ठरला. त्यातही खेदाची बाब म्हणजे सहा महिन्यांपूर्वीच त्यांनी बाळाला जन्म दिला होता आणि 10 दिवसांपूर्वीच त्यांनी ऑफिसला येणं सुरू केलं होतं. पण शुक्रवारची सकाळ ट्रीसा यांच्यासाठी अखेरची सकाळ ठरली. घरून ऑफिसला जात असताना एलफिन्स्टन परळ स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये ट्रीसा पॉल यांचा मृत्यू झाला. 

एलफिन्स्टन परळ स्टेशनवरील पुलावर शुक्रवारी सकाळी चेंगराचेंगरी झाली आणि या चेंगराचेंगरीने 20 पेक्षा जास्त बळी घेतले. या घटनेनं राज्यातच नाही, देशभरातून हळहळ व्यक्त केली जाते आहे. मुंबईत रोज लाखो लोक ट्रेनने प्रवास करतात. ट्रेनने प्रवास करणारी आपली व्यक्ती घरी येईलच की नाही ? याची शाश्वती कधी कुणीही देऊ शकत नाही, अशी स्थिती आहे. मुंबईत आज घडलेल्या दुर्घटनेत कुणी आपली आई, कुणी बहीण, कुणी भाऊ तर कुणी वडील गमावले आहेत. ह्रदयाचा ठोका चुकविणाऱ्या या घटनेमध्ये नुकतीच बाळंतिण झालेल्या एका आईने आपला जीव गमावला आहे. ट्रीसा पॉल या त्या कंपनीत  सेक्रेटरी पदावर कार्यरत होत्या. 

लोअर परळमधील फिनिक्स मॉलमध्ये ऑफिस असलेली ही कंपनी साकीनाक्यामधील नव्या ऑफिसमध्ये मंगळवारी म्हणजेच 3 ऑक्टोबरपासून शिफ्ट होत आहे. सध्याच्या लोअर परळमधील ऑफिसमध्ये आज प्रत्येकाचा शेवटचा दिवस होता. उद्यापासून दोन तारखेपर्यंत सुट्टी असल्याने तीन ऑक्टोबरपासून सगळेच नवीन ऑफिसमध्ये जाणार आहेत. ट्रीसा यांचाही लोअर परळमधील ऑफिसमध्ये आज शेवटचा दिवस होता. उद्यापासून त्यांनाही एलफिन्स्टन परळ स्टेशनच्या पुलाचा वापर करावा लागणार नव्हता. पण त्याआधीच ट्रीसा रॉय यांचा या अपघातात दुर्दैवी अंत झाला आहे. ट्रीसा यांच्यासारखे इतरही लोक या अपघातात मृत्यूमुखी पडले आहेत. रेल्वे प्रशासन आता तरी जागं होईल का आणि प्रवाशांना चांगल्या पायाभूत सुविधा देईल का? हा प्रश्न आहे.
 

Web Title: O mysterious - the last day of Parel's office was the last!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.