ओबामा-गडकरींत होणार ‘सी-प्लेन’बाबत चर्चा
By admin | Published: January 23, 2015 02:23 AM2015-01-23T02:23:45+5:302015-01-23T02:23:45+5:30
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या भारत भेटीदरम्यान केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी त्यांच्याशी ‘सी-प्लेन’ तंत्रज्ञानाबाबत चर्चा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
नागपूर : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या भारत भेटीदरम्यान केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी त्यांच्याशी ‘सी-प्लेन’ तंत्रज्ञानाबाबत चर्चा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यामुळे देशात पर्यटन वाढीस चालना मिळणार आहे. तसेच वाहतुकीची समस्या सुटण्यासही मदत होईल.
ओबामा यांच्या दौऱ्यादरम्यान दोन्ही देशांमध्ये अनेक महत्त्वाचे करार होणार आहेत. त्याचाच एक भाग म्हणून केंद्रीय मंत्री गडकरी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना ‘सी-प्लेन’चे तंत्रज्ञान भारताला देण्याची विनंती करणार आहेत. या क्षेत्रात अमेरिका आणि कॅनडा हे दोन देश अतिशय प्रगत मानले जातात. हे तंत्रज्ञान भारताला मिळाले तर देशात सी-प्लेनची वाहतूक मोठ्या प्रमाणावर सुरू होईल. तसेच यामुळे पर्यटनही वाढीस लागणार आहे. गडकरी यांच्या पुढाकारामुळेच यापूर्वी सी-प्लेनची चाचणी नागपूर जिल्ह्यात खिंडसी आणि मुंबई येथे घेण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
ओबामांच्या भेटीबाबत भारतात उत्सुकता असून, भारत-अमेरिकेचे संबंध अधिक दृढ होतील.