मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचे जशास तसे प्रत्युत्तर; वडीगोद्री येथे उपोषण सुरु करणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2024 06:33 PM2024-09-18T18:33:09+5:302024-09-18T18:40:08+5:30

OBC Leader Laxman Hake News: आंतरवली सराटीपासून दोन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या वडीग्रोदी येथे उपोषणाला बसण्याची तयारी लक्ष्मण हाके यांनी केल्याचे सांगितले जात आहे.

obc leader laxman hake likely to start hunger strike in wadigodri to replied maratha leader manoj jarange | मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचे जशास तसे प्रत्युत्तर; वडीगोद्री येथे उपोषण सुरु करणार!

मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचे जशास तसे प्रत्युत्तर; वडीगोद्री येथे उपोषण सुरु करणार!

OBC Leader Laxman Hake News: कोणीतरी माणूस उपोषणाला बसतोय म्हणून आम्हाला उपोषणाला बसण्याची इच्छा नाही. आम्ही कायद्याची संविधानाची भाषा बोलणारे माणसे आहोत. या सरकारला आंदोलनाची भाषा समजत असेल तर आम्ही थोडसे आऊट ऑफ जाऊन प्रति आंदोलन करण्याच्या मानसिकतेमध्ये आहोत. हे आंदोलन एक-दोन दिवसांमध्ये आम्ही जाहीर करू, असे लक्ष्मण हाके यांनी लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथे व्यक्त सांगितले

सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी व्हावी, मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली आहे. पत्रकारांशी बोलताना लक्ष्मण हाके म्हणाले की,  धनगर समाज ओबीसींमध्ये साडे तीन टक्के आरक्षण फॉलो करतो. ओबीसी समाजाचे आरक्षण टिकावे, यासाठी धनगर समाजाचीही जबाबदारी आहे. मलाही भूलथापा देता येतात. मुख्यमंत्र्यांचे हसू येते. जीआर काढण्याचे अधिकार कुणी दिले. मी संविधानाची भाषा करतो. संसदेचे, राष्ट्रपतींचे अधिकार मुख्यमंत्र्यांना दिलेत का, या महाराष्ट्रात काय चालले आहे, अशी विचारणा ओबीसी समाजाचे आरक्षण वाचावे, ही मागणी लावून धरणाऱ्या लक्ष्मण हाके यांनी केली आहे. 

या आजी-माजी मुख्यमंत्र्यांची लाज वाटते

सुमार दर्जाचे लोक मुख्यमंत्रीपदी, घटनात्मक पदांवर बसले आहेत. संपूर्ण राज्याच्या दायित्वाची शपथ घेतलेला मुख्यमंत्री एका जातीला रेडकार्पेट घालतो आणि दुसऱ्या जातीचे एंटरटेन्मेंट करतो. लाज वाटत नाही का, यांच्याच रांगेत पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण जाऊन बसतात. शरद पवार असतील, उद्धव ठाकरे असतील हे सगळे जण मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगेंना भेटायला जातात. परंतु, ओबीसीच्या एकाही माणसाला भेटावेसे वाटत नाही. या आजी-माजी मुख्यमंत्र्यांची लाज वाटते, अशी बोचरी टीका लक्ष्मण हाकेंनी केली. 

कोणाला पाडायचे, हे आम्ही ठरवले आहे

मनोज जरांगे म्हणत असलेले गॅझेट कधीचा विषय आहे, किती सालचे आहे. मुख्यमंत्री महोदय तुम्ही सांगू शकता का हे गॅझेट कधीचे आहे, असा सवाल करत, हे गॅझेट स्वातंत्र्यपूर्व कालखंडातील आहे. स्वातंत्र्यपूर्व कालखंडातले पुरावे ग्राह्य धरले जाणार असतील तर महाराष्ट्रातल्या व्हीजेएनटी अ प्रवर्गाला पहिल्यांदा एसटीचे रिझर्वेशन द्यावे लागेल. व्हीजेएनटी ब प्रवर्गाला एससी, एसटीचे रिझर्वेशन द्यावे लागेल. धनगर समाजाला एसटीचे रिझर्वेशन द्यावे लागेल. निजामाचे गॅजेटच बघायचे आहे ना, सगळ्या ओबीसी मधील जाती, बलुत्या मधील जाती, हे सगळे एससी आणि एसटीमध्ये शिफ्ट होतील. मुख्यमंत्री महोदय गॅझेट काढायचा आहे ना लवकर काढा, असे लक्ष्मण हाके म्हणाले . तसेच आम्ही निवडणुकीत उतरणार नाही. कोणाला निवडून द्यायचे ते आम्ही पाहू. पण कोणाला पाडायचे, हे आम्ही ठरवले आहे. मनोज जरांगे यांनी २८८ जागांचे जाऊ द्या. पण त्यापूर्वी कर्जत जामखेड, कवठे-महांकाळ, परभणी, नांदेड या ठिकाणचे उमेदवार आधी जाहीर करून दाखावेत, असे जाहीर आव्हान लक्ष्मण हाकेंनी दिले. 

दरम्यान, ओबीसी आरक्षण संपवण्याचा डाव सुरू आहे. धनगरांना ओबीसी आंदोलनातून बाहेर काढायचे. ओबीसी चळवळ गलितगात्र करायची. मराठ्यांना आरक्षण देऊन ओबीसींच्या आरक्षणाची चौकट उद्ध्वस्त करण्याचे काम महाराष्ट्रातील आजी-माजी मुख्यमंत्र्यांकडून होत आहे, अशी टीका लक्ष्मण हाकेंनी केली. 
 

Web Title: obc leader laxman hake likely to start hunger strike in wadigodri to replied maratha leader manoj jarange

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.