“भुजबळांना टार्गेट केले, शरद पवार अन् मनोज जरांगेंमध्ये हिंमत असेल...”: लक्ष्मण हाके

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2024 02:25 PM2024-09-24T14:25:32+5:302024-09-24T14:26:24+5:30

Laxman Hake News: राजरत्न आंबेडकर शरद पवारांचा एजंट आहे का? अशी विचारणा लक्ष्मण हाकेंनी केली.

obc leader laxman hake replied sharad pawar and manoj jarange patil over maratha reservation | “भुजबळांना टार्गेट केले, शरद पवार अन् मनोज जरांगेंमध्ये हिंमत असेल...”: लक्ष्मण हाके

“भुजबळांना टार्गेट केले, शरद पवार अन् मनोज जरांगेंमध्ये हिंमत असेल...”: लक्ष्मण हाके

Laxman Hake News: ओबीसी आणि मराठा आंदोलनाच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापत असल्याचे पाहायला मिळत आहे. एकीकडे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केले असून, ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये, यासाठी लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वात आंदोलन सुरू आहे. यातच आता शरद पवार यांनी मनोज जरांगे यांच्या भूमिकेला समर्थन दर्शवल्यानंतर लक्ष्मण हाके यांनी टीका केली आहे. 

मराठा आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे. हा पाठिंबा देत असताना समाजातील इतर लहान घटकांनाही सोबत घेतले पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. मराठा समाजाचे एक वैशिष्ट्ये होते की, हा समाज इतर जाती-जमातींना सोबत घेऊन जाणारा आहे. अगदी शिवछत्रपतींच्या काळापासून बघितले तरी अठरापगड जातीधर्माच्या लोकांना सोबत घेऊन रयतेचे राज्य उभा करण्याचा आदर्श शिवछत्रपतींनी घालून दिला आहे आणि तीच भावना आजही समाजातील सर्व घटकांमध्ये आहे. मनोज जरांगे यांची आरक्षणाची मागणी योग्य आहे आणि ही मागणी करत असताना इतर समाजातील लोकांचा विचार करावा, अशी भूमिका अनेकांनी मांडली आहे. विशेषत: जरांगे पाटील यांनी स्वत:ही अशी भूमिका मांडली आहे. त्यांनी सांगितले की, धनगर, मुस्लीम, लिंगायत अशा इतर समाजालाही आरक्षण मिळावे. त्यामुळे सर्व लहान घटकांना सोबत घ्यावे, असे आमचे म्हणणे आहे, असे शरद पवार म्हणाले होते. यानंतर आता लक्ष्मण हाके यांनी टीका केली.

आहे का  शरद पवार आणि जरांगेमध्ये हिंमत?

धनगरांना एसटी आरक्षण जाहीर करा मग आम्ही ओबीसीचा आरक्षण ठरवू असे म्हणत आहे का शरद पवार आणि मनोज जरांगेमध्ये हिंमत? असा सवाल लक्ष्मण हाकेंनी केला. ओबीसी आरक्षणाची भूमिका आम्ही ठरवू, असे लक्ष्मण हाके यांनी स्पष्ट केले. ओबीसी आंदोलनात फूट पाडू नका. आतापर्यंत छगन भुजबळ यांना टार्गेट केले. धनगरांना टार्गेट करण्याच्या भानगडीत पडू नका. ते तुम्हाला सोसणार नाही, असा इशारा लक्ष्मण हाके यांनी दिला. 

दरम्यान, आम्हाला शासनाने आश्वासन द्यावे की, ५४ लाख नोंदी केल्यास म्हणता आणि ओबीसीला धक्का लागत नाही असेही म्हणता. ओबीसी आरक्षणाला धक्का कसा लागत नाही, हे सांगावे. आधी धनगरांना एसटी आरक्षण जाहीर करा. मग आम्ही ओबीसीचा आरक्षण ठरवू. राजरत्न आंबेडकर शरद पवारांचा एजंट आहे का? राजरत्न आंबेडकर यांना ओळखत नाही. बाबासाहेब आंबेडकर यांना ओळखतो. रामदास आठवले, जोगेंद्र कवाडे यांना ओळखतो. आंबेडकर तुम्हाला आमदार, खासदार व्हायचे असेल, येथील ओबीसींच्या विरोधात भूमिका घ्यायची असेल तर त्यांनी नाव बदलावे, अशी टीका लक्ष्मण हाके यांनी केली. 
 

Web Title: obc leader laxman hake replied sharad pawar and manoj jarange patil over maratha reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.