“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2024 04:26 PM2024-09-23T16:26:21+5:302024-09-23T16:28:40+5:30

OBC Reservation Vs Maratha Reservation: संभाजीराजे भोसले यांनी ओबीसी विषयी असलेला द्वेष दाखवून दिला, अशी टीका करण्यात आली आहे.

obc leader navnath waghmare reaction over sambhaji raje chhatrapati meeting with manoj jarange patil | “संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?

“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?

OBC Reservation Vs Maratha Reservation: एकीकडे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण तीव्र होत असताना, दुसरीकडे आरक्षणाच्या विषयावरून मराठा आंदोलक आणि ओबीसी आंदोलक आमने-सामने आल्याचे पाहायला मिळत आहेत. संभाजीराजे छत्रपती यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. तसेच महायुती सरकारवर हल्लाबोल केला. यावरून ओबीसी आंदोलकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत संभाजीराजेंवर टीकास्त्र सोडले. 

ही काय पद्धत आहे? तिकडे (सरकारकडे) मेडिकल रिपोर्ट जातो. मेडिकल रिपोर्ट इतका वाईट आहे. काहीही होऊ शकते. त्याला तुम्ही जबाबदार असाल. हे चालणार नाही. आज तुमची कॅबिनेट आहे ना, मग घ्या ना निर्णय. हो किंवा नाही म्हणून टाका. मी दोघांनाही जबाबदार धरतो. पहिले सरकार आणि दुसरे विरोधी पक्षनेते. तुम्ही एकत्र येऊन सांगा की देऊ शकता की नाही. माझी मनोज जरांगेंशी कितीतरी वर्षांपासून ओळख आहे. मनोज जरांगेंचा प्रामाणिक लढा असतो. मी सगळ्यांना सांगू इच्छितो, असे संभाजीराजे यांनी मनोज जरांगे यांच्या भेटीदरम्यान स्पष्ट शब्दांत सांगितले. 

संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले

यावरून आता ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी संभाजीराजे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. आमच्या शिव्या सुरु झाल्या तर जातीयवादी मराठ्यांच्या नेत्याच्या अंगावर कपडेसुद्धा राहणार नाहीत. संभाजीराजे भोसले यांनी ओबीसी विषयी असलेला द्वेष दाखवून दिला. राजा रयतेचा असतो प्रजेचा असतो तो एका जातीचा नसतो. मतांची बेरीज करण्यासाठी संभाजीराजे मनोज जरांगेंची भेट घेण्यासाठी आले, या शब्दांत नवनाथ वाघमारे यांनी निशाणा साधला.

दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज यांचे राज्य निर्माण होण्यासाठी अठरापगड जातींनी जीवाची पर्वा केली नाही. आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारांचे आम्ही पाईक आहोत. संभाजीराजे छत्रपती यांना शोषितांचा कळवळा नाही. मनोज जरांगे यांचे आंदोलन राजकारणासाठीच आहे. संभाजी राजे तुम्हाला राजे म्हणायला लाज वाटते. तुम्ही छत्रपती शाहू राजांचे आणि शिवरायांचे वारस नाहीत. मिस्टर संभाजी भोसले, ही रयत तुम्हाला राजा मानणार नाही, या शब्दांत लक्ष्मण हाके यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. 
 

Web Title: obc leader navnath waghmare reaction over sambhaji raje chhatrapati meeting with manoj jarange patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.