जरांगेंच्या आव्हानावर भुजबळांनी खेळली पुढची चाल; "आता तर आम्हाला विधानसभा, लोकसभेतही आरक्षण हवे"

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2024 05:25 PM2024-06-22T17:25:40+5:302024-06-22T17:26:11+5:30

OBC - Maratha Reservation issue: एक लक्षात ठेवा आरक्षण हा गरिबी हटावचा कार्यक्रम नाही. गरीब तर सर्वच आहेत. आमचीही लेकरे काय गाड्या घोड्यात फिरत नाहीत, भुजबळांची जरांगेवर टीका.

OBC - Maratha Reservation issue: Now we want reservation in Vidhan Sabha, Lok Sabha too; chagan Bhujbal played the next move on manoj Jarange's challenge | जरांगेंच्या आव्हानावर भुजबळांनी खेळली पुढची चाल; "आता तर आम्हाला विधानसभा, लोकसभेतही आरक्षण हवे"

जरांगेंच्या आव्हानावर भुजबळांनी खेळली पुढची चाल; "आता तर आम्हाला विधानसभा, लोकसभेतही आरक्षण हवे"

ओबीसी नेते कसे निवडून येतात तेच पाहतो, असे जरांगे पाटलांनी उघडपणे आव्हान दिल्याने मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसींना निवडून येण्यासाठी लोकसभा आणि विधानसभेतही आरक्षण हवे अशी मागणी केली आहे. लक्ष्मण हाके यांनी ओबीसी समाजाचे आरक्षण स्थगित केले. यानंतर भुजबळांनी पत्रकारांशी संवाद साधला. 

जरांगे पाटील ओबीसी नेते कसे निवडून येतात ते पाहतो. त्यांना पाडण्याची भाषा करत आहेत. अशातच भुजबळांनी पुढची चाल खेळली आहे. आम्ही लोकसभेत जायचे नाही, विधानसभेत जायचे नाही. गरीब तर सर्वच आहेत. आमचीही लेकरे काय गाड्या घोड्यात फिरत नाहीत. आता लोकसभा आणि विधानसभेतही आम्हाला आरक्षण पाहिजे. जात गणना झालीच पाहिजे, अशी मागणी भुजबळांनी केली आहे. 

आंदोलनाला बसलेले भटक्या विमुक्त आणि ओबीसींचे वाघ आहेत. दोन तीन वेळेला आमचे सहकारी इथे येवून गेले. कालच्या बैठकीत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासोबत चर्चा झाली त्यानुसार आम्ही भेटायला आलो. गेले दहा दिवस अनेक ठिकाणी उपोषणे सुरु आहेत. शेवटी आपल्याला लढायचे आहे. त्यामुळे आमचे वाघ आम्हाला रस्त्यावर पाहिजेत. धमक्या बिमक्या खुप येतात पण जाऊद्या. शरीफ है हम, किसीसी लढते नही है हम, जमाना जानता है हम किसीके बापसे डरते नही, अशा शब्दांत शेर सुनावत भुजबळांनी जरांगेंवर हल्ला चढविला. 

नोव्हेंबरला मंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि 17 तारखेला इथे आलेलो. स्थानिक नेत्यांनी चांगले सहकार्य केल्याबदल आभारी आहे. अंतरवाली सराटीतून जे येऊन गेले त्यांचेही आभार मानतो. लढाई संपलेली नाही अजून आपल्याला खुप लढावे लागणार आहे. मला कल्पना आहे निवडणुकीच्या अगोदर आणि निवडणकीनंतर घरांवर हल्ला करण्यात आला. मारपीट झाली हे सगळे पाहून जीव जळत होता. कितीही मोठी शक्ती असली तरी लोकशाहीत त्या शक्तीचा पराभव होतो. धनशक्ती नाही तर ही लोकशक्ती सर्वात श्रेष्ठ आहे, असे भुजबळ म्हणाले. 

तसेच आमच्या ताटातले असेच राहु द्या, त्यांना दुसऱ्या ताटातले द्या म्हणत आम्ही त्याला पाठिंबा दिला. एक लक्षात ठेवा आरक्षण हा गरिबी हटावचा कार्यक्रम नाही. महात्मा ज्योतिराव फुलेंनी 300 वर्षांपूर्वी सांगितलं जे गरीब आहे त्यांना न्याय मिळाला पाहिजे. शाहू महाराजांनीही हेच सांगितलेले, असेही भुजबळ म्हणाले. 

Web Title: OBC - Maratha Reservation issue: Now we want reservation in Vidhan Sabha, Lok Sabha too; chagan Bhujbal played the next move on manoj Jarange's challenge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.