OBC Reservation: ओबीसींच्या आरक्षणासाठी भाजप आक्रमक, राज्यभर जोरदार निदर्शनं अन् रास्तारोको

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2021 11:01 AM2021-06-26T11:01:32+5:302021-06-26T11:02:09+5:30

राज्यात मुंबई, ठाणे, पुणे, बीड, नागपूर, चंद्रपूर, औरंगाबाद, नाशिक अशाविविध ठिकाणी भाजपचे कार्यकर्ते आणि ओबीसी नेते रस्त्यावर उतरले आहेत. 

OBC Reservation BJP aggressive in state chakka jam protest | OBC Reservation: ओबीसींच्या आरक्षणासाठी भाजप आक्रमक, राज्यभर जोरदार निदर्शनं अन् रास्तारोको

OBC Reservation: ओबीसींच्या आरक्षणासाठी भाजप आक्रमक, राज्यभर जोरदार निदर्शनं अन् रास्तारोको

Next

OBC Reservation Bjp Protest: ओबीसींची जातनिहाय जनगणना करा, राजकीय व इतर क्षेत्रातील व जिल्ह्यातील आरक्षण पुर्ववत करा, अन्यथा सत्ता सोडा, ओबीसींचे आरक्षण अबाधित ठेवा अशा मागण्यांसह भाजपाचं आज राज्यभर ठाकरे सरकारविरोधात चक्काजाम आंदोलन सुरू आहे. राज्यात मुंबई, ठाणे, पुणे, बीड, नागपूर, चंद्रपूर, औरंगाबाद, नाशिक अशाविविध ठिकाणी भाजपचे कार्यकर्ते आणि ओबीसी नेते रस्त्यावर उतरले आहेत. 

मुंबईत आशिष शेलार आणि मनोज कोटक यांच्या नेतृत्वाखाली मुलुंड टोलनाक्याजवळ भाजपनं चक्काजाम आंदोलन सुरू केलं आहे. ओबीसी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त राज्यात ठिकठिकाणी करण्यात आला आहे. आशिष शेलार आणि भाजप कार्यकर्त्यांनी मुलुंड टोलनाक्याजवळ रस्त्यावरच ठिय्या देत ठाकरे सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली आहे. 

पुण्यात भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केलं जाणार आहे. तर परळीत प्रीतम मुंडे आंदोलनाचं नेतृत्व करणार आहेत. ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी भाजपानं जेलभरो आंदोलन आज केलं आहे. यात १ लाख लोकांचं जेलभरो आंदोलनाचा पवित्रा भाजपनं घेतला आहे. 

"ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी समाजाचं राजकीय आरक्षण रद्द झालं आहे. त्यामुळे आज भाजपाच्या शेकडो कार्यकर्त्यांना अटक झाली तरी चालेल. पण या नाकर्त्या सरकारला जाग यायला हवी. जोवर ओबीसींचं राजकीय आरक्षण पूर्ववत होत नाही तोवर आमची भूमिका अशीच दिवसेंदिवस तीव्र करू", असं आशिष शेलार म्हणाले. 

दुसरीकडे मंत्रालय परिसरात देखील भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला आहे. या मोर्चात भाजपचे नेते गिरीष महाजन सहभागी झाले आहेत. ओबीसी समाजामध्ये आज प्रचंड रोष आहे. सरकारमध्ये कोणतीही एकवाक्यता नसल्यामुळे ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द झालंय, असं गिरीष महाजन म्हणाले.  

Web Title: OBC Reservation BJP aggressive in state chakka jam protest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.