Chhagan Bhujbal OBC Reservation: ओबीसींचे राजकीय आरक्षण कमी होऊ न देण्याची जबाबदारी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची- छगन भुजबळ यांचे रोखठोक विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2022 03:38 PM2022-07-15T15:38:58+5:302022-07-15T15:39:39+5:30

नव्या जनगणनेवेळी ओबीसींची जातनिहाय जनगणना करून घ्यावी, अशीही मागणी केल्याची माहिती

OBC Reservation Status is CM Eknath Shinde Devendra Fadnavis Responsibility says NCP Chhagan Bhujbal | Chhagan Bhujbal OBC Reservation: ओबीसींचे राजकीय आरक्षण कमी होऊ न देण्याची जबाबदारी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची- छगन भुजबळ यांचे रोखठोक विधान

Chhagan Bhujbal OBC Reservation: ओबीसींचे राजकीय आरक्षण कमी होऊ न देण्याची जबाबदारी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची- छगन भुजबळ यांचे रोखठोक विधान

Next

Chhagan Bhujbal OBC Reservation: देशात ओबीसींची लोकसंख्या ही ५४ टक्के असून ओबीसींच्या हक्काचे २७ टक्के आरक्षण ओबीसींना मिळालेच पाहिजे. त्यामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण कमी होणार नाही याची संपूर्ण जबाबदारी राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यावर आहे, असं रोखठोक विधान राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केले. कोरोनामुळे अद्यापही देशात जनगणना होऊ शकलेली नाही. आता देशात जनगणना सुरु करून त्यात ओबीसींची जातनिहाय जनगणना करून घ्यावी, अशीही मागणी केली असल्याची माहिती त्यांनी या वेळी दिली. नाशिकच्या कार्यालयात ते पत्रकारांशी बोलत होते.

"देशात मंडल आयोग लागू झाला त्यावेळी ओबीसींची संख्या ही ५४ टक्के होती. त्यानंतरच्या काळात कुणबी मराठासह १०० हून अधिक जाती या ओबीसीत समाविष्ट झालेल्या आहेत. त्यामुळे निश्चितच ओबीसींची संख्या ही ५४ टक्क्यापेक्षा जास्त असणार आहे. बांठिया आयोगाच्या कार्यपद्धतीला आम्ही विरोध केला होता. कारण आयोगाच्या वतीने आडनावरून माहिती गोळा केली जात होती. यातून ओबीसींची खरी माहिती समोर येणार नाही. त्यामुळे याबाबत आयोगाला कळविण्यात देखील आले होते", असे त्यांनी नमूद केले.

"ओबीसी आयोगाच्या वतीने करण्यात आलेल्या सर्वेक्षणात नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील चार गावांमध्ये चक्क ओबीसींची लोकसंख्या शून्य टक्के असल्याचे अहवालात म्हटले होते. यावर आमच्या कार्यकर्त्यांनी उदाहरणादाखल प्रत्यक्ष दोन गावांमधील लोकसंख्येची पडताळणी केली असता त्यातील एका गावचे सरपंच ओबीसी तर  दोन ग्रामपंचायत सदस्य ओबीसी होते. त्याचप्रमाणे दुसऱ्या गावातील देखील दोन ग्रामपंचायत सदस्य ओबीसी असल्याचे आढळून आलेले होते. त्यामुळे अधिकाऱ्यांनी केवळ कार्यालयात बसून माहिती गोळा करण्यापेक्षा प्रत्यक्षात गावात जाऊन पडताळणी करण्याची आवश्यकता होती. मात्र ते झाले नाही. आता हे प्रकरण न्यायालयात असून त्यातून सकारात्मक निर्णय येईल", अशी आशा भुजबळांनी व्यक्त केली.

Web Title: OBC Reservation Status is CM Eknath Shinde Devendra Fadnavis Responsibility says NCP Chhagan Bhujbal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.