‘सॉक्रेटीस ते दाभोळकर व्हाया तुकाराम’वर आक्षेप

By admin | Published: December 18, 2015 01:23 AM2015-12-18T01:23:03+5:302015-12-18T01:23:03+5:30

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या लोकरंग मंचतर्फे सादर करण्यात येणाऱ्या ‘सॉक्रेटीस ते दाभोलकर व्हाया तुकाराम’ या नाटकावर सनातन संस्थेने आक्षेप घेतला आहे.

The objection to 'Socrates to Dabholkar Vaaya Tukaram' | ‘सॉक्रेटीस ते दाभोळकर व्हाया तुकाराम’वर आक्षेप

‘सॉक्रेटीस ते दाभोळकर व्हाया तुकाराम’वर आक्षेप

Next

मुंबई : अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या लोकरंग मंचतर्फे सादर करण्यात येणाऱ्या ‘सॉक्रेटीस ते दाभोलकर व्हाया तुकाराम’ या नाटकावर सनातन संस्थेने आक्षेप घेतला आहे. या नाटकात संत तुकाराम महाराजांचा खून झाल्याचे दाखवत, अंनिसने वारकऱ्यांच्या धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
अंनिसने या नाटकासाठी राज्य रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण परिमंडळाचे प्रमाणपत्र (सेन्सॉर सर्टिफिकेट) घेतले नसल्याचे माहिती अधिकारातून समजल्याचा आरोपही सनातनने केल्यामुळे प्रमाणपत्र नसताना, राज्यभरात १०० हून अधिक प्रयोग करणाऱ्या अंनिसवर कारवाई करण्याची मागणी सनातनने केली आहे. समीर गायकवाड प्रकरणी दाखल झालेल्या आरोपपत्रात, सनातन संस्थेचा सहभाग नसल्याचे स्पष्ट झाल्याचे सनातनने सांगितले. अंनिसला निराशा आली असून, सनातनची बदनामी करण्यासाठी अंनिस बेछूट आरोप करत असल्याचे सनातनने सांगितले. मुख्यमंत्र्यांनी अंनिसमध्ये सुरू असलेल्या गैरकृत्यांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी तक्रार सनातनने दाखल केली आहे.

Web Title: The objection to 'Socrates to Dabholkar Vaaya Tukaram'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.