श्याम मानव यांच्याबाबत आक्षेपार्ह प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2018 22:01 IST2018-09-06T21:59:36+5:302018-09-06T22:01:01+5:30

An objectionable reaction on Shyam Manav | श्याम मानव यांच्याबाबत आक्षेपार्ह प्रतिक्रिया

श्याम मानव यांच्याबाबत आक्षेपार्ह प्रतिक्रिया

अमरावती : अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे संस्थापक श्याम मानव यांच्याबाबत सोशल मीडियावर अत्यंत आक्षेपार्ह आणि गंभीर स्वरुपाची प्रतिक्रिया नोंदविणाऱ्या अश्विन कोल्हे पाटीलवर तत्काळ कठोर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन गुरुवारी अमरावती जिल्हा प्रशासनाला देण्यात आले. 


'श्याम मानव यांच्या हत्येचा कट' या मथळ्याचे लोकमतचे वृत्त अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे विदर्भ संघटक किशोर वाघ यांनी फेसबुकवर अपलोड केले. त्यावर अनेकांच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या.  हा सिलसिला सुरू असताना बुलडाणा येथील अश्विन कोल्हे नावाच्या अकाऊंटवरून 'करायच होत खत्म जो हिंदु विरोधी, त्याला जगण्याचा अधिकारच नाही' अशी टिपणी केली गेली. मानव यांना ठार मारण्याचा कट रचण्यात आला होता, अशी माहिती एटीएसने यापूर्वीच न्यायालयात सादर केली आहे. त्याअनुषंगाने अमरावतीत येऊन तपासही करण्यात आला आहे.

 
घटनेला ही पार्श्वभूमी असताना कोल्हे पाटील नावाने अपलोड करण्यात आलेली प्रतिक्रिया गंभीर कृत्य ठरते, अशा भावना निवेदनकर्त्यांनी जिल्हा प्रशासनाकडे व्यक्त केल्यात. मुख्यमंत्र्यांच्या नावे देण्यात आलेल्या या निवेदनात मानव यांच्या सुरक्षेचा आढावा घेण्याचीही मागणी करण्यात आली आहे.

 

Web Title: An objectionable reaction on Shyam Manav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.