डॉक्टरांची प्रशासकीय दायित्वातून मुक्तता!

By admin | Published: December 27, 2016 02:05 AM2016-12-27T02:05:51+5:302016-12-27T02:05:51+5:30

महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य सेवेतील वरिष्ठ डॉक्टरांना त्यांच्या कार्यक्षेत्राशी संबंधित प्रशासकीय जबाबदारी व प्रमुख रुग्णालयातील अधिष्ठाता स्तरावरील डॉक्टरांना

Oblivion of the doctor's administrative liability! | डॉक्टरांची प्रशासकीय दायित्वातून मुक्तता!

डॉक्टरांची प्रशासकीय दायित्वातून मुक्तता!

Next

मुंबई : महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य सेवेतील वरिष्ठ डॉक्टरांना त्यांच्या कार्यक्षेत्राशी संबंधित प्रशासकीय जबाबदारी व प्रमुख रुग्णालयातील अधिष्ठाता स्तरावरील डॉक्टरांना आस्थापनाविषयक बाबीदेखील हाताळाव्या लागतात. यामुळे या डॉक्टरांना अनेक वेळा रुग्ण किंवा आरोग्य सेवेसाठी पूर्ण वेळ देता येत नाही. ही बाब लक्षात घेत आता सार्वजनिक आरोग्य खात्यातील सर्व प्रशासकीय बाबी आणि प्रमुख रुग्णालयातील आस्थापनाविषयक बाबी हाताळण्यासाठी स्वतंत्र ‘उपायुक्त’ पदाची निर्मिती करण्यास नुकतीच मंजुरी दिली आहे.
यापूर्वी असणारे उपायुक्त (मध्यवर्ती भरती प्राधिकरण) हे पद आता रद्द करण्यात आले असून, या पदावर कार्यरत असणारे सुनील धामणे यांची सार्वजनिक आरोग्य उपायुक्त या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. प्रशासकीय, आस्थापना या जबाबदाऱ्या हाताळण्यासाठी उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) या पदाची निर्मिती करण्यात आली आहे. या निर्णयामुळे वरिष्ठ स्तरावरील डॉक्टरांना रुग्ण व आरोग्य सेवेसह वैद्यकीय शिक्षण आणि संशोधनासाठी अधिक वेळ देणे शक्य होणार आहे. कार्यकारी आरोग्य अधिकारी, प्रमुख वैद्यकीय अधीक्षक, कीटकनाशक अधिकारी, विशेष रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक, उपनगरीय रुग्णालयातील प्रमुख वैद्यकीय अधीक्षक यांसारख्या महापालिकेच्या वैद्यकीय व आरोग्य सेवेतील वरिष्ठ डॉक्टरांची वा अधिकाऱ्यांची प्रशासकीय दायित्वातून तर ‘अधिष्ठाता’ स्तरावरील डॉक्टरांची आस्थापनाविषयक दायित्वांमधून मुक्तता केल्यास त्यांना रुग्ण व आरोग्य सेवेसह वैद्यकीय शिक्षण आणि संशोधनासाठी अधिक वेळ देता येऊ शकेल.
बृहन्मुंबई महापालिकेची ५ मोठी रुग्णालये व वैद्यकीय महाविद्यालये, १६ उपनगरीय रुग्णालये, ५ विशेष रुग्णालये, सार्वजनिक आरोग्य सेवा, दवाखाने, प्रसूतिगृह यासह विविध सोयी-सुविधांच्या माध्यमातून महापालिका रुग्ण व आरोग्य सेवेसाठी अविरतपणे कार्यरत आहे. महापालिकेच्या वैद्यकीय व आरोग्यविषयक सेवा-सुविधांचा लाभ दरवर्षी लाखो नागरिक घेत असतात. महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये उपचार घेण्यासाठी केवळ मुंबईतूनच नव्हे, तर देशभरातूनच रुग्ण मोठ्या आशेने येत असतात. यामुळे महापालिका रुग्णालयांच्या रुग्ण क्षमतेपेक्षा किती तरी अधिक संख्येतील रुग्णांना महापालिकेद्वारे वैद्यकीय सेवा दिली जात असते. मात्र महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य सेवेतील वरिष्ठ पदांवर कार्यरत असणाऱ्या डॉक्टरांना त्यांच्या रुग्णालयाशी, कार्यक्षेत्राशी संबंधित प्रशासकीय आस्थापनाविषयक बाबीदेखील हाताळाव्या लागतात. यामध्ये डॉक्टरांचा वेळ मोठ्या प्रमाणात खर्ची पडत असल्याने या डॉक्टरांच्या अनुभवांचा व कौशल्यांचा सुयोग्य आणि परिपूर्ण उपयोग रुग्णसेवेसाठी होण्यास मर्यादा येत होत्या. (प्रतिनिधी)

भार कमी होणार
महापालिकेच्या ज्या रुग्णालयांमध्ये ‘अधिष्ठाता’ हे पद आहे, त्या रुग्णालयांतील प्रशासकीय बाबी हाताळण्यासाठी ‘साहाय्यक आयुक्त’ या पदाची निर्मिती करण्याबाबतही महापालिका प्रशासन विचार करीत आहे.
यापूर्वी असणारे उपायुक्त हे पद आता रद्द करण्यात आले आहे. तसेच या पदाकडे असणाऱ्या विविध जबाबदाऱ्या इतर उपायुक्तांकडे विषयानुसार वर्ग करण्यात आल्या आहेत.
यामध्ये प्रामुख्याने भरतीविषयक बाबी उपायुक्त, सामान्य प्रशासन यांच्याकडे तर नियोजन खाते हे उपायुक्त (शिक्षण) यांच्याकडे वर्ग करण्यात आले आहे.

Web Title: Oblivion of the doctor's administrative liability!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.