लोकलमध्ये अश्लील वर्तन; प्रभूंच्या ट्विटनंतर गुन्हा दाखल
By admin | Published: July 11, 2017 05:21 AM2017-07-11T05:21:19+5:302017-07-11T05:21:19+5:30
महिलेला पाहून अश्लील वर्तन करण्यात आलेल्या प्रकरणाची रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी गंभीर दखल घेतली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : लोकलमधून चर्चगेट ते बोरीवली प्रवास करणाऱ्या महिलेला पाहून अश्लील वर्तन करण्यात आलेल्या प्रकरणाची रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी सखोल चौकशी करण्यात यावी, असे आदेश प्रभू यांनी ट्विट करून दिले. रेल्वेमंत्र्यांचे आदेश प्राप्त होताच बोरीवली स्थानकात या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
महाविद्यालयीन शिक्षण घेणारी २२ वर्षीय तरुणी चर्चगेट ते बोरीवली असा प्रवास करत होती. दिव्यांग डब्याला जोडून असलेल्या महिलांसाठीच्या राखीव डब्यातून ही तरुणी प्रवास करत असताना कांदिवली ते बोरीवली स्थानकांदरम्यान दिव्यांग डब्यातून प्रवास करणाऱ्या विकृताने प्रवासी तरुणीकडे पाहत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्याचबरोबर प्रवास करणाऱ्या तरुणीकडे पाहून अश्लील वर्तन करण्यास सुरुवात केली. या प्रकरणी तरुणीने रेल्वे हेल्पलाइनशी संपर्क साधला. हकिकत सांगितल्यानंतर संबंधित व्यक्तीने मदत करण्याऐवजी हे प्रकरण हसण्यावारी नेले, असा आरोप तरुणीने केला आहे. तरुणीने वैतागून फोन कट केला.
दरम्यान, या घटनेबाबत संबंधित तरुणीशी ‘लोकमत’ने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र याबाबत तिने प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. त्यानंतर तरुणीने फेसबूकच्या माध्यमातून या घटनेला वाचा फोडली. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या पोस्टची सुरेश प्रभू यांनी तत्काळ दखल घेतली. टिष्ट्वटच्या माध्यमाने प्रभंूनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
या प्रकरणी रेल्वे पोलीस सीसीटीव्हीच्या फूटेजच्या मदतीने अधिक तपास करत आहेत
>‘हसलो नाही’ आरपीएफचे टिष्ट्वट
लोकलमधील त्या तरुणीच्या फोनचे संभाषण रेकॉर्ड झाले आहे. ते संभाषण तपासले असता संबंधित व्यक्ती हसली नसल्याचा दावा आरपीएफच्या वतीने करण्यात आला आहे. पश्चिम रेल्वे मुंबई विभागीय रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिकृत टिष्ट्वटर अकाउंटवरून या आशयाचे टिष्ट्वट करण्यात आले आहे. हे टिष्ट्वट थेट मुख्यमंत्री कार्यालयासह रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंनादेखील टॅग करण्यात आले आहे.