‘जीएसटी’च्या नमनालाच अडथळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2017 01:05 AM2017-06-18T01:05:51+5:302017-06-18T01:05:51+5:30
जीएसटीची अंमलबजावणी १ जुलैपासून होणार असताना त्याच तारखेपासून विविध मागण्यांसाठी संपावर जाण्याचा निर्णय राजपत्रित अधिकारी महासंघाच्या नेतृत्वात
विशेष प्रतिनिधी । लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : जीएसटीची अंमलबजावणी १ जुलैपासून होणार असताना त्याच तारखेपासून विविध मागण्यांसाठी संपावर जाण्याचा निर्णय राजपत्रित अधिकारी महासंघाच्या नेतृत्वात विक्रीकर अधिकाऱ्यांनी घेतला आहे. तशी नोटीसही विक्रीकर अधिकारी संघटनेने शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविली.
विक्रीकर अधिकारी संवर्गाची समकक्षता केंद्रातील अबकारी कर विभागातील अधिकाऱ्यांप्रमाणे असावी, केंद्राच्या धर्तीवर जीएसटीसाठीची प्रशासकीय यंत्रणा राज्यातही उभारावी, जीएसटी वसुलीसाठी विक्रीकर विभागाची आवश्यक यंत्रणा १ जुलैपूर्वी उभारावी, वित्त विभागाच्या शासन निर्णयानुसार विक्रीकर उपायुक्त संवर्गातील १३२ अधिकाऱ्यांना वरिष्ठ वेतनश्रेणी द्यावी, विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची रिक्त पदे तातडीने भरावीत, विभागीय संवर्ग वाटपाच्या शासन निर्णयातून वगळावे आदी मागण्यांसाठी हा संप असेल, असे संघटनेचे अध्यक्ष विनोद देसाई यांनी म्हटले आहे.