दिवाळीच्या औचित्याने 'A soulful Diwali - खरे प्रकाशपर्व' या लघुपटातून 'राम बंधु'ची कोव्हिड योद्ध्यांना अनोखी मानवंदना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2021 04:46 PM2021-11-03T16:46:47+5:302021-11-03T16:47:41+5:30

कोरोना महामारीच्या कालावधीत डॉक्टर, पोलीस या कोव्हिड योद्ध्यांप्रमाणेच स्थानिक किराणा दुकानदार, दूधवाले, भाजीवाले, सफाई कामगार यांनीही अविरत कार्य केले. त्यांच्या सन्मानार्थ हृदयाला स्पर्श करणारा हा लघुपट तयार करण्यात आला आहे.

On the occasion of Diwali, a unique tribute to the covid warriors by 'Ram Bandhu' | दिवाळीच्या औचित्याने 'A soulful Diwali - खरे प्रकाशपर्व' या लघुपटातून 'राम बंधु'ची कोव्हिड योद्ध्यांना अनोखी मानवंदना!

दिवाळीच्या औचित्याने 'A soulful Diwali - खरे प्रकाशपर्व' या लघुपटातून 'राम बंधु'ची कोव्हिड योद्ध्यांना अनोखी मानवंदना!

googlenewsNext

>> किराणा दुकानदार, दूधवाले, भाजीवाले, सफाई कामगार इत्यादी कोव्हिड योद्धा असल्याची लघुपटाची मध्यवर्ती संकल्पना
>> नामांकित अभिनेते शिवाजी साटम आणि किशोर कदम यांच्या मुख्य भूमिका
 
मुंबई: राम बंधु या फ्लॅगशिप ब्रॅन्डसाठी प्रसिद्ध असलेल्या 'एम्पायर स्पाइसेस अँड फुड्स लिमिटेड' (ईएसएफएल) या भारतातील आघाडीच्या फूड (FMCG) कंपनीने दिवाळीच्या औचित्याने 'A soulful diwali - खरे प्रकाशपर्व' हा मराठी लघुपट प्रदर्शित केला आहे. कोरोना महामारीच्या कालावधीत डॉक्टर, पोलीस या कोव्हिड योद्ध्यांप्रमाणेच स्थानिक किराणा दुकानदार, दूधवाले, भाजीवाले, सफाई कामगार यांनीही अविरत कार्य केले. हे सुद्धा कोव्हिड योद्धा असून त्यांना आधार देत त्यांच्या सन्मानार्थ हृदयाला स्पर्श करणारा हा लघुपट तयार करण्यात आला आहे. त्यांच्या सन्मानार्थ यंदाच्या दिवाळीत एक दिवा लावू, असा अनोखा संदेशही देण्यात आला आहे.

या लघुपटात एका किराणा दुकानदाराची गोष्ट दाखवण्यात आली आहे. ही भूमिका नामांकित अभिनेते किशोर कदम यांनी साकारली आहे. गोकुळधाम सोसायटीमधील किराणा दुकान आणि या दुकानमालकाची चिंता या लघुपटातून मार्मिकपणे दाखविण्यात आली आहे. "या महामारीशी लढा देण्यासाठी आपल्याला मदत करणाऱ्या अगणित कोव्हिड योद्ध्यांच्या आपण ऋणात आहोत, अशी राम बंधुमधील सर्व सदस्यांची भावना आहे. या लघुपटाच्या माध्यमातून आम्हाला त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची होती आणि म्हणूनच यंदाच्या दिवाळीमध्ये आपल्या परिसरातील कोव्हिड योद्धा, स्थानिक किराणा दुकानदार, दूधवाले, भाजीवाले, सफाई कामगार आणि इतर योद्ध्यांचा सन्मान करण्यासाठी आपण एक दिवा लावूया", असे आवाहन ईएसएफएलचे अध्यक्ष हेमंत राठी यांनी केले आहे. 

या लघुपटाबाबत प्रतिक्रिया देताना ईएसएफएलचे व्यवस्थापकीय संचालक उमेश राठी म्हणाले, "महामारीच्या काळात छोट्या व्यावसायिकांना फटका बसला आणि त्याच्या झळा अजूनही सोसाव्या लागत आहेत. आपले स्वतःचे आरोग्य आणि सुरक्षितता धोक्यात घालून जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी स्थानिक किराणा दुकानांनी महत्त्वाची भूमिका बजावली. अशा नि:स्वार्थी योद्ध्यांना या लघुपटाच्या माध्यमातून मानवंदना देण्यात आली आहे."

"या लघुपटाची कथा मनाला इतकी भावली की, माझे वेळापत्रक व्यस्त असूनही मी याला नकार देऊ शकलो नाही. या दिवाळीमध्ये राम बंधु सारख्या प्रस्थापित ब्रँडने अशा प्रकारचा संदेश देण्याचे ठरविले, याचे मला कौतुक वाटते. अशा उदात्त उपक्रमाचा एक भाग झाल्याचा मला खूप आनंद आहे", अशा भावना अभिनेता शिवाजी साटम यांनी व्यक्त केल्या.

व्हाईटलाइन स्टुडियोने या लघुपटाची निर्मिती केली आहे. व्हाईटलाइन स्टुडियोजचे क्रिएटिव्ह प्रमुख हेमंत बेळे म्हणाले, “दिवाळीच्या औचित्याने राम बंधुतर्फे प्रदर्शित करण्यात आलेला ‘A soulful diwali - खरे प्रकाशपर्व’ हा लघुपट म्हणजे कोव्हिड योद्ध्यांची दखल घेण्याचा आणि ही दिवाळी प्रेम, प्रकाश आणि कृतज्ञतेची भावना मनात ठेवून साजरी करण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे.”

"सामाजिक संदेश असलेल्या अशा लघुपटाचा भाग असणे आणि एका कोव्हिड योद्ध्याची भूमिका साकारण्याची संधी मिळणे हा माझा बहुमान आहे", असे अभिनेते किशोर कदम म्हणाले.

राम बंधुने अलीकडेच त्यांच्या पापड आणि लोणच्यांच्या ब्रँडसाठी अभिनेत्री माधुरी दीक्षित- नेने यांची ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून निवड केली आहे. 

ईएसएफएलच्या ब्रँड पोर्टफोलियोमध्ये राम बंधु, आरबीएम, टेम्प्टीन आणि जायका या ब्रॅंड्सचा समावेश आहे. हे सर्व ब्रँड्स त्यांच्या दर्जेदार गुणवत्ता, चव, विविधता आणि स्वयंपाकात सुलभता यासाठी लोकप्रिय आहेत. या कंपनीने भारतातील १२ राज्यांमधील पाच लाख किरकोळ दुकानांच्या माध्यमातून आपले जाळे विस्तारले आहे. त्याचप्रमाणे त्यांचे १०००+ वितरकांचे बळ असून ग्राहकांना सर्वोत्तम उत्पादने आणि चविष्ट पदार्थ पोहोचवत आहेत. या कंपनीतर्फे यूएस, यूके, कतार, दुबई, कॅनडा, जर्मनी, नेदरलँड्स, लक्झम्बर्ग, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि बहारिन येथे उत्पादने निर्यात करण्यात येतात.

Web Title: On the occasion of Diwali, a unique tribute to the covid warriors by 'Ram Bandhu'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.