कोकणातील पत्रकारीतेचा सागर शांत झाला
By admin | Published: June 3, 2017 06:41 PM2017-06-03T18:41:26+5:302017-06-03T18:41:26+5:30
निशिकांत तथा नानासाहेब जोशी यांचे आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास त्यांच्या चिपळूण येथील राहात्या घरीच अल्पशा आजाराने निधन झाले.
Next
ऑनलाइन लोकमत
रत्नागिरी, दि. 3 - ‘प्रथम मी पत्रकार आणि मग नते सागंणारे आणि आयूष्याच्या अखेरच्या क्षणा र्पयत ते पाळणारे कोकणातील चिपळूण येथून प्रसिद्ध होणा-या दैनिक सागर या वृत्तपत्रचे संपादक निशिकांत तथा नानासाहेब जोशी यांचे आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास त्यांच्या चिपळूण येथील राहात्या घरीच अल्पशा आजाराने निधन झाले. निधन समयी त्यांचे वय 89 होते. स्व.नानासाहेबांच्या मागे त्यांच्या पत्नी शुभदा निशिकांत जोशी, नामांकीत उद्योजक पूत्र प्रशांत उर्फ राजू निशिकांत जोशी, स्नूषा अरुंधती व दोन नातू असा परिवार आहे.
शिक्षक ते पत्रकार एक अनोखी वाटचाल
कोकणातील पत्रकारीतेचा सागर अशीच ओळख असणा-या स्व.नानासाहेबांचे प्राथमिक शिक्षण चिपळूण मधील युनायटेड हायस्कुलमध्ये झाले. मुंबईतील चिकित्सक हायस्कूल मध्ये त्यांचे माध्यमिक शालांत शिक्षण झाले. शालांत शिक्षणांती त्यांनी पुणो येथे बी.एड.पदवी संपादन करुन प्रथम शिक्षकी पेशा स्विकारला. पुणो येथे शिक्षण घेत असतानाच त्यांचा परिचय शुभदा निशिकांत जोशी(वैद्य) यांच्या बरोबर झाला. दोघेही समविचारी विवाहबद्ध झाले आणि सन 1962 मध्ये चिपळूण येथे आहे. स्व.नानासाहेबांचे प्राथमिक शिक्षण झालेल्या चिपळूणच्या युनायटेड हायस्कूल मध्ये उभयतांना शिक्षक म्हणून नोकरीस प्रारंभ केला.
कोकणातून मुंबईत दैनिक पाठविणारे संपादक
सामाजिक परिवर्तनात वृत्तपत्रचे अनन्य साधारण स्थान आहे,अशा विचारातून स्व.नानासाहेबांनी 2क् जून 1965 रोजी चिपळूण मध्येच ‘सागर’ हे साप्ताहिक सुरु केले. साप्ताहिकाचे रुपांतर त्रैमासीक, द्वीमासीक असे करित सन 1972 मध्ये दैनिक सागर दैनिकाच्या स्वरुपात सुरु केला. अल्पावधीतच कोकणात पाच आवृत्या काढण्यात त्यांना यश आले. त्यांकाळात दैनिक वृत्तपत्रे मुंबईतून कोकणात येत असत, परंतू कोकणातील प्रश्न राज्याच्या राजधानीत पोहोचले तरच सुटू शकतात, या हेतूने कोकणातील दैनिक मुंबईत पाठविणारे स्व.नानासाहेब कोकणातील अत्यंत जागृक संपादक व मालक होते. सागरच्या प्रवासाची देखील यंदा 52 वर्ष पूर्ण होत आहेत.
कोकणातील यशस्वी आमदार
पुरोगामी विचारांचे कॉग्रेसचे अत्यंत निष्ठवंत कार्यकर्ते आणि नेते असा राजकीय क्षेत्रत नावलौकीक संपादन केलेल्या स्व.नानासाहेबांनी ज्येष्ठ विचारवंत व काँग्रेसचे तत्कालीन नेते बाळासाहेब सावंत यांच्या प्ररणोने राजकारणात प्रवेश केला होता. सामान्य माणसाशी अत्यंत प्रामाणिक बांधीलकी असणा:या, स्व.नानासाहेबांनी तत्वनिष्ठ, चारित्र्यसंपन्न, पुरोगामी नेता असे कोकणवासीयांच्या :हदयात स्थान संपादन केले होते. त्यातूनच स्व.नानासाहेबांना चिपळूणच्या मतदारांनी सन 1985 मध्ये आमदार म्हणून निवडून देवून महाराष्ट्राच्या विधानसेभेत कोकणाचे प्रश्न मांडण्याकरीता पाठविले होते. 1985 ते 1989 अशा पाच वर्षाच्या त्यांच्या आमदारकीच्या कारकिरर्दीत त्यांनी कोकणातील अनेक प्रश्न मांडून ते सोडविण्यात यश मिळविले होते. परंतू वर्तमानातील राजकारणा बाबत ते नाराज असत आणि म्हणूनच अखेरच्या टप्प्यात गेली काही वर्ष ते सक्रीय राजकारणातून दूर होते.
पदाची अभिलाषा न ठेवता सातत्याने कार्यरत
कोणत्याही राजकीय वा सत्तेतील पदाची अभिलाषा न ठेवता सातत्याने कार्यरत राहीलेल्या स्व.नानासाहेबांनी राजकारण आणि पत्रकारीता याची गल्लत कधीही होवू दिली नाही. अर्थशास्त्रचे विद्यार्थी असणा:या स्व.नाना आपल्या अमोघ वक्तृत्वाने समोरच्यांना जिंकून घेत असत. साहित्याचा गाढा अभ्यास आणि अभ्यासाविना बोलणो नाही, या सुत्रमुळे त्यांची कोणत्याही विषयालरील भाषणो ही अभ्यासपूर्ण आणि अधिकारवाणीचीच असत. वाचनातू लेखनप्रभूत्व संपादन करता येते आणि लेखनातून वक्तृत्व कौशल्य विकसित होते असे सुत्र ते नेहमी सांगत असत. महाराष्ट्रातील ग्रामीण पत्रकारीतेत त्यांचे अन्यन्यसाधारण योगदान होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कोकणात अनेक पत्रकार तयार झाले.