जकात बुडविणारे अटकेत

By admin | Published: April 2, 2015 04:58 AM2015-04-02T04:58:07+5:302015-04-02T04:58:07+5:30

मुंबईत विक्रीसाठी येणाऱ्या विविध कंपन्यांची कर बनावट कागदपत्रे आणि कर पावत्यांच्या आधारे तब्बल १ कोटी ५२ लाख जकात चुकवून मुंबईत

Octroi holder | जकात बुडविणारे अटकेत

जकात बुडविणारे अटकेत

Next

मुंबई : मुंबईत विक्रीसाठी येणाऱ्या विविध कंपन्यांची कर बनावट कागदपत्रे आणि कर पावत्यांच्या आधारे तब्बल १ कोटी ५२ लाख जकात चुकवून मुंबईत आणल्याची धक्कादायक माहिती समोर आली. याप्रकरणी तीन जकात एजंटांना नवघर पोलिसांनी अटक केली आहे. यामध्ये रॅकेटमध्ये जकात अधिकाऱ्यांचाही सहभाग असल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
तुकाराम बाबू दळवी, नितीन श्रीरंग पवार आणि घन:शाम सीताराम सिंग अशी आरोपींंची नावे आहेत. या ठगांनी साथीदार अशदुल जाकीर शेख, संदीप शिंदे यांच्या मदतीने ही फसवणूक केल्याचे तपासात उघड झाले. मुलुंड पूर्वेकडील आनंद नगर जकात नाक्यावर काही ठगांनी मिळून श्याम संकेत आणि ओमसाई नावाने जकात एजंट कार्यालयच थाटले होते. जकात नाक्यावर आलेल्या पालिका अधिकाऱ्यांंच्या मदतीने हे एजंट बनावट कागदपत्रे तयार करून मुंबईमध्ये माल वाहतूक करणाऱ्या कंपन्यांच्या वाहनांना हे एजंट प्रवेश मिळवून देत असत. अशाप्रकारे या जकात एजंटांनी १ एप्रिल २०११ ते ३ डिसेंबरपर्यंत २०१३ पर्यंत बीएमडब्लू कंपनीच्या गाड्यांचा १ कोटी ५२ लाख २३ हजार ६९० रुपयांचा कर बुडवून मुंबईत प्रवेश मिळवून दिल्याचे समोर आले. याप्रकरणी कार कंपनीच्या अधिकाऱ्यांनी याप्रकरणी नवघर पोलीस ठाण्यात तक्रार करताच हा प्रकार उघडकीस आला आणि नवघर पोलिसांनी या तिघांना अटक केली.

Web Title: Octroi holder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.