‘तो’ जकात नाका अखेर हटविला

By Admin | Published: June 9, 2017 01:08 AM2017-06-09T01:08:06+5:302017-06-09T01:08:06+5:30

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा येथील बंद जकात नाका हटविण्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने सेवा रस्त्याच्या कामात अडथळा होत होता

The 'octroi' was finally deleted | ‘तो’ जकात नाका अखेर हटविला

‘तो’ जकात नाका अखेर हटविला

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
किवळे : देहूरोड-कात्रज बाह्यवळण महामार्गाच्या जागेत असणारा पिंपरी-चिंचवड महापालिकेचा येथील बंद जकात नाका हटविण्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने सेवा रस्त्याच्या कामात अडथळा होत होता. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर संबंधितांनी तातडीने दखल घेऊन बुधवारी जकात नाका हटविला. त्यामुळे सेवा रस्त्याच्या कामातील अडथळा झाला दूर झाला आहे.
किवळे येथील जकात नाका क्रमांक २६ हा देहूरोड-कात्रज बाह्यवळण मार्गाच्या जागेत ठेवण्यात आला होता. महामार्गाचे सहा पदरीकरण पूर्ण झाले असून, महामार्गाच्या सेवा रस्त्याचे काम देहूरोड कॅन्टोन्मेन्ट बोर्डाच्या हद्दीतून पूर्ण होत आले आहे. मात्र, महापालिका हद्दीतील या बंद जकात नाक्यामुळे विकासनगर भागात रखडले होते. गेल्या महिन्यात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने महापालिका आयुक्तांना ६ मे रोजीच्या पत्रान्वये संबंधित नाका काढून घेण्याची मागणी केली होती. मात्र, बंद असलेला जकात नाका काढण्याबाबत महापालिका प्रशासनाने काहीही कार्यवाही न केल्याने नगरसेविका संगीता भोंडवे यांनी गेल्या शुक्रवारी सेवा रस्त्याला अडथळा ठरणाऱ्या नाक्याची महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांसह पाहणी करून नाका काढण्यासाठी अ क्षेत्रीय प्रशासन अधिकारी यांना पत्र दिले होते. ‘लोकमत’ने ‘सेवा रस्ता कामात नाक्याचा अडथळा’ या शीर्षकाने छायाचित्रासह सविस्तर वृत मंगळवार, दि. ६ जूनच्या अंकात प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची महापालिका प्रशासनाने बुधवारी बंद जकात नाका शेडवजा कार्यालय काढून टाकले आहे. नाका हटविल्याने सेवा रस्त्याचे काम तातडीने सुरू केले आहे.

Web Title: The 'octroi' was finally deleted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.