सबनीसांविरोधात गुन्हा

By admin | Published: January 8, 2016 03:41 AM2016-01-08T03:41:59+5:302016-01-08T03:41:59+5:30

अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी निगडी पोलीस

Offense Against Sabnis | सबनीसांविरोधात गुन्हा

सबनीसांविरोधात गुन्हा

Next

पिंपरी : अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय जनता पक्षाचे पिंपरी-चिंचवड शहर कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर थोरात यांनी ही तक्रार दिली आहे.
निगडीतील विद्यार्थी साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमात सबनीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी एकेरी शब्द वापरले होते. त्यामुळे थोरात यांनी सबनीस यांच्याविरोधात तक्रार दिली आहे. त्यानंतर सबनीस यांच्याविरोधात निगडी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल आहे. दरम्यान ‘पंतप्रधान मोदी यांचा एकेरी उल्लेख करून देशाच्या पंतप्रधानपदाचा अपमान केला आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या व्यासपीठावर अशा व्यक्तीला आम्ही कोणत्याही परिस्थितीत येऊ देणार नाही. त्यांच्याविरोधात महाराष्ट्रभर गुन्हे दाखल करणार आहोत. आम्ही फक्त शांततेच्या मार्गाने त्यांच्या वक्तव्याचा निषेध करणार आहे. सबनीस यांनी माफी मागावी, अन्यथा त्यांच्या प्रतिकृतीची अंत्ययात्रा काढू,’ असा इशारा साबळे यांनी दिला आहे.

Web Title: Offense Against Sabnis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.