विषबाधेप्रकरणी ‘बॉक्स ८’वर गुन्हा
By admin | Published: April 16, 2016 02:53 AM2016-04-16T02:53:15+5:302016-04-16T02:53:15+5:30
महाविद्यालयात आयोजिलेल्या परिषदेदरम्यान विद्याथ्यांना वितरित केलेल्या खाद्यपदार्थांमुळे १७ विद्याथ्यांना विषबाधा झाल्याने गुरुवारी खळबळ उडाली. या प्रकरणी खाद्य पुरविणारे
मुंबई : महाविद्यालयात आयोजिलेल्या परिषदेदरम्यान विद्याथ्यांना वितरित केलेल्या खाद्यपदार्थांमुळे १७ विद्याथ्यांना विषबाधा झाल्याने गुरुवारी खळबळ उडाली. या प्रकरणी खाद्य पुरविणारे बॉक्स ८ कंपनीचे व्यवस्थापक, कर्मचारी विरुद्ध खार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबईसह पुणे, बंगलोर या शहरांमध्ये बॉक्स ८ या कंपनीच्या ५० हून अधिक शाखा आहेत. वांद्रे येथील थाडोमल शहानी महाविद्यालय, हाजीअली येथील लाला महाविद्यालय, व्हिसलिंग वूड्स, चर्चगेट येथील के.सी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी ‘इंडियन इंटरनॅशनल मॉडेल युनायटेड नेशन २०१५-१६’ या परिषदेचे गुरुवारी आयोजन करण्यात आले होते. या परिषदेसाठी सुमारे १ हजार ४०० विद्यार्थी उपस्थित होते. येथील कार्यक्रमात उपस्थित राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बॉक्स ८च्या ठाणे शाखेतून राजमा आणि भाताचे बॉक्सेस आॅनलाईन मागविण्यात आले होते. या बॉक्सेस मधील खाद्य खाल्याने थाडोमल शहानी आणि लाला महाविद्यालयातील एकूण १७ विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. खार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रामचंद्र जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्यांनी सेवन केलेल्या खाद्यपदाथार्चे नमुने चाचणीसाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. या प्रकरणी अद्याप अटक करण्यात आलेली नाहीह्ण असे जाधव यांनी सांगितले. दोन्ही महाविद्यालयाचा विषबाधे प्रकरणाचा एकत्रित तपास खार पोलीस करणार आहेत. आमच्याकडील तपास त्यांच्याकडे वर्ग करण्यात आल्याची माहिती ताडदेव पोलिसांनी दिली. (प्रतिनिधी)
एफडीएच्या अधिकाऱ्यांकडून ’बॉक्स ८’ची झडती
विषबाधा प्रकरणानंतर ठाणे येथील बॉक्स ८ च्या ज्या शाखेतून खाद्य शिजवले गेले त्या विभागाची एफडीच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी दुपारी ४ च्या सुमारास झडती घेतली. अधिकाऱ्यांनी येथील विभागाची पाहणी केली.
या पाहणी अहवालानुसार पुढील कारवाई केली जाईन अशी माहिती एफडीएचे सहाय्यक आयुक्त, (अन्न ) सुरेश अन्नपुरे यांनी दिली. तर राजमा आणि भाताचे नमुने पोलिसांनी घेतले असून त्याची तपासणी पोलीस करणार आहेत असेही अन्नपुरे यांनी सांगितले.