विनापरवाना फटाके विक्री करणाऱ्यांवर गुन्हा

By Admin | Published: October 31, 2016 03:56 AM2016-10-31T03:56:33+5:302016-10-31T03:56:33+5:30

पदपथावर विनापरवाना फटाक्यांची विक्री करणाऱ्या कोपरीगाव येथील प्रकाश कोठावळे विरोधात कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला

Offense for sale of unauthorized firecrackers | विनापरवाना फटाके विक्री करणाऱ्यांवर गुन्हा

विनापरवाना फटाके विक्री करणाऱ्यांवर गुन्हा

googlenewsNext


ठाणे : पदपथावर विनापरवाना फटाक्यांची विक्री करणाऱ्या कोपरीगाव येथील प्रकाश कोठावळे विरोधात कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्याच्याकडून फटाके जप्त केल्याची माहिती पोलिसांनी दिली. घोडबंदर रोड, ओवळा नाका येथील अन्नपूर्णा पोळीभाजी केंद्रासमोरील पदपथावर कोठावळे हा विनापरवानगी फटाके विक्री करीत होता.
याचदरम्यान, शनिवारी कासारवडवली पोलीस ठाण्याचे प्रशांत सांगळे आणि पी.एन.घोडके हे गस्त घालत असताना त्यांच्या हे निदर्शनास आले. या प्रकरणी गुन्हा दाखल करत त्याच्याकडून चार हजार ३६० रुपयांचे फटाके जप्त केले. सहा. पो. निरीक्षक आनंद करगुटकर तपास करीत आहेत.
>बेकायदा दुकाने बंद
मीरा रोड : औरंगाबाद येथे फटाक्यांच्या दुकानांना शनिवारी लागलेल्या आगीच्या घटनेनंतर मीरा भार्इंदर महापालिकेनेही फटक्यांची विक्री सुरु असलेल्या ठिकाणी अग्निशमन दलाचे बंब तैनात केले आहेत. शिवाय शहरात सुरु असलेल्या २३ पैकी १३ बेकायदा दुकाने बंद केली असून १० दुकाने खुल्या मैदानात स्थलांतरीत केली आहेत. भार्इंदर पूर्वेला मोकळ्या जागेत फटाक्याच्या विक्र ीला परवानगी दिली आहे.

Web Title: Offense for sale of unauthorized firecrackers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.