व्हॉट्स अँपवर आक्षेपार्ह पोस्ट; ग्रुप अँडमिनला अटक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2017 02:21 AM2017-02-22T02:21:33+5:302017-02-22T02:21:33+5:30

रात्रीच्या सुमारास रिसोड पोलीस स्टेशनमध्ये नागरिकांची गर्दी झाली.

Offensive post of What's Ape! Group Admin arrested! | व्हॉट्स अँपवर आक्षेपार्ह पोस्ट; ग्रुप अँडमिनला अटक!

व्हॉट्स अँपवर आक्षेपार्ह पोस्ट; ग्रुप अँडमिनला अटक!

Next

रिसोड, दि. २१- व्हॉट्स अँप ग्रुपवरील प्रोफाइल छायाचित्र बदलून आक्षेपार्ह छायाचित्र टाकल्याप्रकरणी व्हॉट्स अँपच्या ग्रुप अँडमिनविरुद्ध गुन्हा दाखल करून रिसोड पोलिसांनी मंगळवारी त्याला ताब्यात घेतले. ही घटना तालुक्यातील वाकद येथे सोमवारी रात्री ९.३0 वाजताच्या सुमारास उघडकीस आली होती.
हरीश भारत झिजान यांनी फिर्याद नोंदविली की, शाहरुख खा, अलीयार खा हा ह्यऑल इन वनह्ण या व्हॉट्स अँप ग्रुपचा अँडमिन असून त्याने स्वत: मोराचे पंखासारखे फुलपाखराचे प्रोफाइल छायाचित्र ठेवले असताना, या छायाचित्रात बदल करून महापुरुषाचे आक्षेपार्ह छायाचित्र बनविले आणि सदर छायाचित्र प्रोफाईल म्हणून अपलोड केले. यामुळे समाजबांधवांच्या भावना दुखावल्या. सोमवारी रात्री वाकद येथे तणाव निर्माण झाला होता. रिसोड ते वाकद हा मार्ग काही तास बंद ठेवण्यात आला होता. आक्षेपार्ह फोटो टाकल्याप्रकरणी सोमवारी रात्रीच्या सुमारास रिसोड पोलीस स्टेशनमध्ये नागरिकांची गर्दी झाली होती. याप्रकरणी सोमवारी रात्रीदरम्यान फिर्याद दाखल झाली. या फिर्यादीवरून शाहरुख खा, अलीयार खा याच्याविरुद्ध कलम २९४ भादंवि अन्वये गुन्हा दाखल केला. रिसोड पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. पुढील तपास उपविभागीय अधिकारी जयकुमार चक्रे, ठाणेदार प्रकाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजय रत्नपारखी करीत आहेत.

शांतता समितीची सभा
वाकद येथे शांतता निर्माण करण्याच्या उद्देशाने २१ फेब्रुवारी रोजी ग्रामपंचायत येथे शांतता समितीची सभा घेण्यात आली. यावेळी गावात शांतता ठेवण्याचे आवाहन सर्वधर्मीय समाजबांधवांच्या वतीने करण्यात आले. याप्रसंगी दिलीप देशमुख, अशोक भोपाळे, शिवलाल बिजोरे, संतोषसिंह ठाकूर, गोपाल चोपडे, दत्ता बोडखे, राजू खोलगाडे, भागवत तिडके, सरपंच रशीद कुरेशी, अकिलभाई, अँड. शब्बीर शाह, शे. गुलाबभाई, सुनील लाटे, भारत अंभोरे यांनी मनोगत व्यक्त केले. शिवसेना तालुकाप्रमुख महादेवराव ठाकरे व अँड. गजानन अवताडे यांनीही वाकदला भेट देऊन पाहणी केली.

Web Title: Offensive post of What's Ape! Group Admin arrested!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.