विद्यार्थ्यांच्या मार्कशीटवर आक्षेपार्ह शेरा
By admin | Published: May 20, 2017 01:36 AM2017-05-20T01:36:23+5:302017-05-20T01:36:23+5:30
नवीन पनवेलमधील सेंट जोसेफ स्कूलने पालकांना धडा शिकविण्याच्या हेतूने थेट विद्यार्थ्यांच्या मार्कशीटवरच आक्षेपार्ह शेरा दिला आहे. दोन वर्षांपासून फी वाढीच्या निर्णयाविरोधात
- लोकमत न्यूज नेटवर्क
पनवेल : नवीन पनवेलमधील सेंट जोसेफ स्कूलने पालकांना धडा शिकविण्याच्या हेतूने थेट विद्यार्थ्यांच्या मार्कशीटवरच आक्षेपार्ह शेरा दिला आहे. दोन वर्षांपासून फी वाढीच्या निर्णयाविरोधात पालकांनी आंदोलन केले होते. पालकांच्या या भूमिकेमुळे शाळेने विद्यार्थ्यांच्या मार्कलिस्टवर ‘प्रॉब्लेमॅटिक पेरेंट्स फीस नॉट पेड’असे लिहिले आहे.
सरकारच्या नियमानुसार, दोन वर्षातून एकदा १५ टक्क्यांपर्यंत फीवाढ करता येते. मात्र, ही शाळा दरवर्षी मोठ्या पमाणात फी वाढ करीत होती. साधारण महिन्याला ८०० ते १००० रुपये फी असायला हवी होती. शाळेने ती १६०० ते १८०० रुपयांवर नेऊन ठेवली आहे. या विरोधात पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा लढा सुरू आहे. पालकांनी शिक्षण अधिकारी आणि शिक्षणमंत्र्यांकडे शाळेविरोधात तक्रार दाखल केली होती. शिक्षणमंत्र्याकडे झालेल्या बैठकीत पुढील निर्णय होत नाही, तोपर्यंत वाढीव फी वसूल करू नये, असे आदेश दिले होते. मात्र, या निर्णयाला हरताळ फासत, शाळा व्यवस्थापनाने फी वसूल करण्यास सुरुवात केली. फी न भरणाऱ्या पालकांना वकिलामार्फत नोटीस देण्यात आली आहे.
यामध्ये कायदेशीर कारवाई करण्याचे संकेत देत, वकिलाची फी ही पालकांकडूनच वसूल करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर, ज्या पालकांनी शाळेच्या मनमानी कारभाराविरोधात आंदोलने केली होती, त्यांच्या मुलांच्या मार्कशीटवर ‘प्रॉब्लेमॅटिक पेरेंट्स फीस नॉट पेड’ असा शेरा लाल पेनने लिहिला आहे.
शाळेच्या या कृतीचा पालकांनी निषेध केला आहे. आपल्या मुलाची आणि आपली शाळेने मानहानी केली असून, शाळेविरोधात अब्रुनुकसानीचा दावा कोर्टात करणार आहेत.
६०पेक्षा जास्त विद्यार्थ्यांच्या मार्कशीटवर हा शेरा लिहिला असल्याचे पालक गौरव कदम
यांनी सांगितले. या संदर्भात
पोलीस ठाण्यातदेखील तक्र ार दाखल केली आहे.
पालकांच्या पाठीशी शिवसेना
- सेंट जोसेफ शाळेच्या या वागण्यामुळे दुखावलेल्या पालकांशी शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी संवाद साधला. शाळेच्या निर्णयाविरोधात शिवसेना पालकांच्या पाठीशी असल्याचे सांगितले, तसेच सेनेचे संपर्कप्रमुख आदेश बांदेकर यांनी पालकांना एकत्र बोलावून बैठक घेणार असल्याचे स्पष्ट केले.