आक्षेपार्ह मजकूर विदेशातून
By admin | Published: June 6, 2014 01:45 AM2014-06-06T01:45:50+5:302014-06-06T01:45:50+5:30
जातीय दंगलींना कारणीभूत ठरलेल्या संशयिताचा माग काढणो पोलिसांना अवघड जाणार आहे. महाराष्ट्र पोलिसांना यासंदर्भात फेसबुककडून आलेले उत्तर याला पुष्टी देणारे आहे.
Next
>फेसबुक प्रकरण : संशयिताचा माग काढणो पोलिसांसाठी अवघड
डिप्पी वांकाणी - मुंबई
छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी फेसबुकवर आक्षेपार्ह मजकूर टाकणा:याने प्रॉक्झी सव्र्हर वापरला असून, त्याच्या आयपी (इंटरनेट प्रोटोकॉल) अॅड्रेसचा माग रुमानिया, नेदरलँड्स, आर्यलड आणि सौदी अरेबिया अशा वेगवेगळ्या देशांत लागत आहे. त्यामुळे जातीय दंगलींना कारणीभूत ठरलेल्या संशयिताचा माग काढणो पोलिसांना अवघड जाणार आहे.
महाराष्ट्र पोलिसांना यासंदर्भात फेसबुककडून आलेले उत्तर याला पुष्टी देणारे आहे. या प्रकरणाचा तपास करणा:या
एका वरिष्ठ पोलीस अधिका:याने सांगितले, हा मजकूर अनेक देशांतून फिरून आल्याने संशयिताने वापरलेला नेमका आयपी अॅड्रेस शोधून काढणो अवघड आहे. शनिवारी फेसबुकवर हा
मजकूर प्रसारित होताच पश्चिम महाराष्ट्रातील पुणो, सोलापूर, कोल्हापूर, बीड आणि सांगली या शहरांत जातीय दंगे झाले होते. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणून फेसबुकवरून तो मजकूर काढून टाकायला लावला होता.
मानवी हेराद्वारेच छडा
याबाबतीत आता तांत्रिक साधनांवर विसंबून राहून उपयोग नाही. जर मानवी हेरांकडून काही माहिती मिळू शकली तरच छडा लागू शकतो, अशी माहिती एका वरिष्ठ आयपीएस अधिका:याने दिली.