आक्षेपार्ह मजकुरावरून सोलापुरात दगडफेक
By admin | Published: March 21, 2016 03:15 AM2016-03-21T03:15:30+5:302016-03-21T03:15:30+5:30
सोशल मीडियावरील व्हॉट्स अॅप गु्रपवर आक्षेपार्ह मजकूर टाकल्याचा संताप व्यक्त करीत अज्ञात युवकांनी आसरा चौकात दगडफेक करून चार दुकाने फोडली़ ही घटना रविवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली़
सोलापूर : सोशल मीडियावरील व्हॉट्स अॅप गु्रपवर आक्षेपार्ह मजकूर टाकल्याचा संताप व्यक्त करीत अज्ञात युवकांनी आसरा चौकात दगडफेक करून चार दुकाने फोडली़ ही घटना रविवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली़
शनिवारी रात्री व्हॉट्स अॅप
गु्रपवर आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध करण्यात आला़ या प्रकरणी
व्हॉट्स अॅप गु्रपचा अॅडमिन अरविंद शहा याने विजापूर नाका पोलिसांत फिर्याद दिली़ घटनेची माहिती मिळताच शहरातील काही युवकांनी रविवारी दुपारी एकच्या सुमारास विजापूर नाका पोलीस ठाण्यासमोर गर्दी केली होती़ आक्षेपार्ह मजकूर टाकणाऱ्यांवर त्वरित गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी केली़
संतप्त युवकांनी प्रारंभी
जुळे सोलापुरातील दावत हॉटेलजवळ आरडाओरडा करून शिवीगाळ करण्यास सुरूवात केली़ काही युवकांनी दुकाने बंद करण्यास
भाग पाडत आसरा चौक गाठले़ आसरा पुलाजवळील काही दुकाने
व हॉटेलची तोडफोड केली.
घटनेची माहिती समजताच पोलीस उपायुक्त अपर्णा गीते यांच्या
पथकाने घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली़