हवाई दलातील अधिकारी पतीची हत्या

By admin | Published: May 10, 2014 11:08 PM2014-05-10T23:08:53+5:302014-05-10T23:08:53+5:30

दक्षिण पश्‍चिम दिल्लीच्या छावणी भागात राहणार्‍या ४0 वर्षांच्या एका हवाई दल अधिकार्‍याचा त्याच्या पत्नीने आपल्या किशोरवयीन प्रियकराच्या मदतीने गळा दाबून खून केला.

Officer in-charge of Air Force | हवाई दलातील अधिकारी पतीची हत्या

हवाई दलातील अधिकारी पतीची हत्या

Next
>नवी दिल्ली : दक्षिण पश्‍चिम दिल्लीच्या छावणी भागात राहणार्‍या ४0 वर्षांच्या एका हवाई दल अधिकार्‍याचा त्याच्या पत्नीने आपल्या किशोरवयीन प्रियकराच्या मदतीने गळा दाबून खून केला. आपल्या नवर्‍याला हृदयविकाराचा झटका आल्याचे सांगून, या खुनाला नैसर्गिक मृत्यूचे रूप देण्याचा प्रयत्न या महिलेने केला असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या महिलेच्या १७ वर्षांच्या प्रियकरालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. एप्रिल महिन्याच्या १0 तारखेला घडलेल्या या घटनेत वायुसेनेतील सार्जंट रमेश चंद्रा याचा त्याच्या पत्नीने गळा दाबून खून केला. या दिवशी राजधानीत लोकसभेच्या निवडणुकीसाठी मतदान झाले होते. 
हा अधिकारी सकाळच्या वेळी घरात बसून दारू पीत असताना त्याच्या मद्यधुंद अवस्थेचा फायदा घेत सुधा चंद्रा नावाच्या त्याच्या बायकोने आपल्या मित्राला बोलावून घेतले             व त्याचा गळा दाबून त्याला ठार केले.
त्यानंतर ती नवर्‍याचे शव घेऊन जवळच्या रुग्णालयात गेली व डॉक्टरांना सांगितले की, त्यांच्या छातीत खूप दुखत असून त्यामुळे ते बेशुद्ध झाले आहेत. डॉक्टरांनी रमेश चंद्रा यांना तपासून मृत घोषित केले व पोलिसांना कळवले. 
(लोकमत न्यूज नेटवर्क)
 
-पोलिसांना या प्रकरणाचा संशय आल्याने त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. या विच्छेदन अहवालात मृत्यूचे कारण श्‍वास गुदमरून, असे आल्याने या प्रकरणाचा तपास सुरू झाला व सत्य उघडकीस आले. 
-पोलिसांनी तपास केल्यानंतर सुधा चंद्राने व त्यानंतर तिच्या प्रियकरानेही आपला गुन्हा कबूल केला. या दोघांनाही अटक करण्यात आली आहे. रमेश चंद्रा व सुधा चंद्रा हे आपल्या चार वर्षांच्या मुलीसोबत राहात होते.

Web Title: Officer in-charge of Air Force

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.