सिंचन चौकशीसाठी अधिकारी मिळाले!

By admin | Published: April 21, 2015 02:12 AM2015-04-21T02:12:51+5:302015-04-21T02:12:51+5:30

कोकण परिक्षेत्रात मोडणाऱ्या १२ वादग्रस्त सिंचन प्रकल्पांमधील घोटाळ्यांच्या चौकशीसाठी अखेर एक चार्टर्ड अकाऊन्टंट आणि अन्य विधी सल्लागारांची नियुक्ती करण्यास आज राज्याच्या गृह विभागाने मंजुरी दिली.

Officer got irrigation inquiry! | सिंचन चौकशीसाठी अधिकारी मिळाले!

सिंचन चौकशीसाठी अधिकारी मिळाले!

Next

मुंबई - कोकण परिक्षेत्रात मोडणाऱ्या १२ वादग्रस्त सिंचन प्रकल्पांमधील घोटाळ्यांच्या चौकशीसाठी अखेर एक चार्टर्ड अकाऊन्टंट आणि अन्य विधी सल्लागारांची नियुक्ती करण्यास आज राज्याच्या गृह विभागाने मंजुरी दिली.
सिंचन घोटाळ्याची खुली चौकशी करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चार महिन्यांपूर्वीच परवानगी दिली असली तरी विधी सल्लागार आणि चार्टर्ड अकाऊन्टंटअभावी चौकशी पुढे सरकत नव्हती. हे दोन्ही अधिकारी तात्काळ उपलब्ध करून द्यावेत अश्ी मागणी
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गृह विभागाकडे केली होती. एसीबीने मागणी करूनही विधी सल्लागार आणि सीएंची नेमणूक मात्र केली जात नव्हती त्यामुळे सिंचन घोटाळ्यात भाजपा व राष्ट्रवादीचे साटेलोटे असल्याची टीकादेखील झाली होती. एसीबीला तपासामध्ये सहकार्य व्हावे या दृष्टीने विधी सल्लागार, सीए व तांत्रिक सल्लागाराची नेमणूक गृह विभागाने करावयाची असते. त्यातील तांत्रिक सल्लागाराची नियुक्ती चालू महिन्याच्या पहिल्या आठवड्यात करण्यात आली होती.

Web Title: Officer got irrigation inquiry!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.