अधिकारी, दलालांची हातमिळवणी

By admin | Published: February 3, 2015 01:44 AM2015-02-03T01:44:18+5:302015-02-03T01:44:18+5:30

आरटीओ दलालमुक्त करण्याचे आदेश परिवहन आयुक्तांनी दिलेले असतानाच त्याची राज्यातील आरटीओकडून अंमलबजावणी केली जात असल्याचे अनेक आरटीओकडून सांगण्यात आले.

Officers, the collusion of the brokers | अधिकारी, दलालांची हातमिळवणी

अधिकारी, दलालांची हातमिळवणी

Next

मुंबई : आरटीओ दलालमुक्त करण्याचे आदेश परिवहन आयुक्तांनी दिलेले असतानाच त्याची राज्यातील आरटीओकडून अंमलबजावणी केली जात असल्याचे अनेक आरटीओकडून सांगण्यात आले. तरीही काही अधिकारी आणि कर्मचारी दलालांशी हातमिळवणी करून कामे करीत असल्याची माहिती परिवहन विभागाला मिळाली असून, त्यामुळे निलंबनाची कठोर कारवाई करण्याचा इशारा परिवहन आयुक्त कार्यालयाकडून देण्यात आला आहे.
आरटीओ दलालमुक्त करण्याच्या आदेशाची अंमलबजावणी होत नव्हती. अखेर १२ जानेवारी २0१५ रोजी परिवहन आयुक्त महेश झगडे यांनी आरटीओ १७ जानेवारीपासून दलालमुक्त करण्याचे आदेश आरटीओंना दिले आणि १९ जानेवारीपासून आरटीओंना अचानक भेट देणार असल्याचेही सांगितले. यात दुर्लक्ष झाल्यास त्याची गंभीर दखल घेऊन कारवाई करण्याची ताकीदही परिवहन आयुक्तांकडून देण्यात आली. तरीही काही अधिकारी आणि कर्मचारी दलालांच्या संपर्कात असल्याचे परिवहन आयुक्तांच्या निदर्शनास आले आहे. परिवहन आयुक्त कार्यालयाकडून ३१ जानेवारी २0१५ रोजी एक पत्रक काढण्यात आले असून, यात सर्व आरटीओतून अनधिकृत व्यक्तींना वावर करण्यास पूर्णपणे प्रतिबंध करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
मात्र काही आरटीओंबाहेरील अनधिकृत व्यक्ती आरटीओतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी हातमिळवणी करून कार्यालयाबाहेरून कागदपत्रे पाठवून अनधिकृतपणे नागरिकांची कामे करून देत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. ही बाब अतिशय गंभीर असून, कोणी अधिकारी किंवा कर्मचारी अशा प्रकारे हातमिळवणी करीत असल्याचे निदर्शनास आल्यास निलंबनाची कारवाई करण्याचा इशाराही या पत्रकातून दिला आहे. यातूनच अजूनही आरटीओ अधिकारी आणि दलालांचा संपर्क असल्याचे स्पष्ट झाले
आहे. (प्रतिनिधी)

राज्यातील आरटीओ कार्यालयांना दलालांचा विळखा बसल्याने सर्वसामान्यांना जादा पैसे आकारून अनेक कामे करावी लागत आहेत. यात आरटीओतील कर्मचाऱ्यांचीही मोठ्या प्रमाणात साथ दलालांना मिळत असल्याचे निदर्शनास आल्याने २00७ आणि २0१२ रोजी आरटीओ दलालमुक्त करण्याचे आदेश काढण्यात आले.

Web Title: Officers, the collusion of the brokers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.