अधिकारी, कर्मचाऱ्यांना गणवेश सक्तीचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2017 01:02 AM2017-04-06T01:02:44+5:302017-04-06T01:02:44+5:30
महापालिका अधिकाऱ्यांना स्थायी समिती बैठकीसाठी गणवेश सक्ती केली जाणार आहे
पिंपरी : महापालिका अधिकाऱ्यांना स्थायी समिती बैठकीसाठी गणवेश सक्ती केली जाणार आहे. ‘बैठकीस गणवेशात न येणाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई करणार असल्याचे महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकारांना दिली.
महापालिकचे आयुक्त असताना डॉ. श्रीकर परदेशी यांनी महापालिकेच्या प्रशासकीय कारभारात सुधारणा करण्यासाठी दहा कलमी कार्यक्रमाची आखणी केली. त्यामध्ये महापालिकेमार्फत देण्यात येणाऱ्या सेवा, कामकाज व सुविधांची तपासणी, महापालिकेच्या कामकाजाची गुणवत्ता वाढविण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये स्पर्धा आदींचा समावेश होता. स्थायी समिती अध्यक्ष सीमा सावळे यांनी चांगल्या उपक्रमांचे पुनरुज्जीवन करण्याची सूचना आयुक्त दिनेश वाघमारे यांना केली. अधिकाऱ्यांना स्थायी समिती सभांना गणवेश सक्ती कायम करावी, असे आयुक्तांना सांगितले. ‘सीमा सावळे यांनी केलेल्या आदेशांचे पालन केले जाईल. गणवेश परिधान न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करू, असे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
>स्थायी समितीच्या विषयपत्रिकेवर १०५ प्रस्ताव होते. त्यात अवलोकनाच्या १०३ प्रस्तावांचा समावेश आहे. त्यापैकी १६ प्रस्ताव तहकूब करण्यात आले आहेत. तर, शाळा स्वच्छतेचे काम करणाऱ्या कंत्राटदाराला मुदतवाढ देण्याचे दोन प्रस्तावही तहकूब करण्यात आले आहेत. याबाबत भांडार विभाग आणि आरोग्य विभागाकडे खुलासा मागविला आहे, असे सावळे यांनी सांगितले.