अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे रॅकेट उद्ध्वस्त

By admin | Published: June 2, 2017 04:07 AM2017-06-02T04:07:28+5:302017-06-02T04:07:28+5:30

आयएएस, आयपीएससह बड्या शासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या करून देतो असे सांगून प्रचंड रकमा उकळणारे एक रॅकेट मुंबईच्या

Officers transferred the transfer rackets | अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे रॅकेट उद्ध्वस्त

अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे रॅकेट उद्ध्वस्त

Next

यदु जोशी/ लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : आयएएस, आयपीएससह बड्या शासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या करून देतो असे सांगून प्रचंड रकमा उकळणारे एक रॅकेट मुंबईच्या क्राईम ब्रँचने उघडकीस आणले आहे. या रॅकेटमधील चौघांना अटक करण्यात आली आहे.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये शासकीय दूध योजनेचा वरिष्ठ अधिकारी विद्यासागर हिरमुखे, पुणे येथील विशाल उंबळे, सोलापूर येथील राष्ट्रीय समाजवादी पार्टीचा पदाधिकारी म्हणविणारा किशोर माळी आणि नवी दिल्लीचा वीरेंद्रसिंग यादव यांचा समावेश आहे.
पोलीस उपायुक्त नामदेव चव्हाण यांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. हिरमुखे आणि इतर तिघांना विमानतळाजवळील पंचतारांकित हॉटेलमध्ये बुधवारी रात्री अटक करण्यात आली. मुंबई पोलीस दलाचे सहआयुक्त (गुन्हे) संजय सक्सेना यांनी या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनसुार, बदलीसाठी आपल्याकडे पैशांची मागणी करण्यात आल्याची तक्रार नामदेव चव्हाण यांनी गुन्हे शाखेकडे केली होती. अटक करण्यात आलेल्या हिरमुखे हा दूध योजनेत बडा अधिकारी आहे. आघाडी सरकारमधील एका राज्यमंत्र्यांचा तो नातेवाइक होता आणि पीएदेखील होता.

मंत्रालयातील काही दलालांचा सहभाग

एवढ्या मोठ्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा अर्थातच मुख्यमंत्री कार्यालयाशी संबंध असतो. त्यामुळे या रॅकेटचा मुख्यमंत्री कार्यालयातील कोणत्या अधिकाऱ्याशी संबंध आहे काय? याचीही चौकशी केली जात असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
धक्कादायक माहिती अशी आहे की,तक्रारीच्या आधारे कारवाई करताना प्रथमदर्शनी लहान वाटणाऱ्या या प्रकरणात बडे मासे गुंतलेले असल्याचे मानले जाते.
या रॅकेटने आतापर्यंत काही अधिकाऱ्यांकडून बदल्यांसाठी काही कोटींच्या घरात रक्कम जमविली. अटक करण्यात आलेला माळी हा ‘सोलापूर कनेक्शन’ने बदल्या करवून घेत होता.
हिरमुखे हा मंत्रालयातील काही दलालांना हाताशी धरत असे. त्यानंतर तो आणि हे दलाल बदलीसाठी इच्छुक असलेल्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधत आणि त्यांच्याकडून रकमेची मागणी करीत असत.

Web Title: Officers transferred the transfer rackets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.