अधिकाऱ्यांना ‘स्वच्छ भारत’ अभियानाची धास्ती

By admin | Published: February 1, 2017 02:44 AM2017-02-01T02:44:31+5:302017-02-01T02:44:31+5:30

सध्या राज्यात १० महापालिकांसह 2५ जिल्हा परिषदा आणि २८३ पंचायत समित्यांमध्ये निवडणुकीची धामधूम सुरू आहे. यात काही चूक झाल्यास एकीकडे निवडणूक आयोगाच्या

The officials are exposed to the 'Clean India' campaign | अधिकाऱ्यांना ‘स्वच्छ भारत’ अभियानाची धास्ती

अधिकाऱ्यांना ‘स्वच्छ भारत’ अभियानाची धास्ती

Next

- नारायण जाधव, ठाणे
सध्या राज्यात १० महापालिकांसह 2५ जिल्हा परिषदा आणि २८३ पंचायत समित्यांमध्ये निवडणुकीची धामधूम सुरू आहे. यात काही चूक झाल्यास एकीकडे निवडणूक आयोगाच्या बडग्याची भीती असताना आता दुसरीकडे ३१ मार्च २०१७पर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत आपले गाव, शहर, महानगर हागणदारीमुक्त न झाल्यास त्याची नोंद राज्यातील महापालिकांच्या आयुक्तांसह जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि नगरपालिकांच्या मुख्याधिकाऱ्यांच्या सेवा गोपनीय अहवालात घेतली जाईल, प्रतिकूल शेरे लिहिले जातील, असे बजावण्यात आले आहे.
स्था. स्व. संस्थांच्या प्रमुखांच्या सीआर अर्थात गोपनीय अहवालात मोदींच्या स्वच्छ भारत अभियानातील हगणदारीमुक्तीची नोंद घेतली जाणार आहे. यात हगणदारीमुक्तीत कामचुकार करणाऱ्या आयुक्त, जि.प. आणि नगरपालिकांचे मुख्याधिकारी यांच्या २०१६-१७ सेवा गोपनीय अहवालात संबंधित अधिकाऱ्याने त्याला दिलेले शौचालयांसह हगणदारीमुक्तीचे उद्दिष्ट पूर्ण केले असेल तर अनुकूल आणि केले नसेल तर प्रतिकूल शेरे लिहावेत. तसे सामान्य प्रशासन विभागालादेखील कळवावे, असे सांगण्यात आले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थातील प्रमुख निवडणूक कामात व्यस्त आहेत. त्यातच याच काळात केंद्र सरकारने नियुक्त केलेली समिती त्या त्या शहरांना भेट देऊन तेथील स्वच्छतेची पाहणी करीत आहे. यामुळे एकीकडे निवडणुकीचे काम चोख ठेवायचे, दुसरीकडे येणाऱ्या समितीची बडदास्त ठेवायची तसेच शहर हागणदारीमुक्तदेखील करायचे असा सामना आयुक्त, मुख्याधिकाऱ्यांना करावा लागत आहे.
वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी केंद्र सरकार तसेच राज्याचा ग्राम विकाससह पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभाग १२ ते १५ हजार रुपयांचे अनुदान देत आहे. मात्र, अनेक लाभार्थ्यांकडे शौचालय बांधण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने प्रशासनापुढे अनेक अडचणी येत आहेत. ठाण्यात ग्रामीण भागाने शौचालय बांधणीत विक्रम केला असून, याबाबत ठाणे जि.प.चे मुख्याधिकारी किशोरराजे निंबाळकर यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गौरव केला आहे. मात्र, शहरी भागात जागेअभावी अनेक अडचणी येत आहेत. (प्रतिनिधी)

नवी मुंबई पालिकेचा उतारा
ठाण्यात ग्रामीण भागाने शौचालय बांधणीत विक्रम केला असून, याबाबत
ठाणे जि.प.चे मुख्याधिकारी किशोरराजे निंबाळकर यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गौरव केला आहे. नवी मुंबई महापालिकेने कंटेनरमध्ये सार्वजनिक शौचालय बांधण्याचा उतारा शोधला आहे.

Web Title: The officials are exposed to the 'Clean India' campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.