भुजबळ कुटुंबीयांविरोधातील आरोपांबाबत अधिका-यांची चौकशी

By Admin | Published: March 12, 2015 05:07 AM2015-03-12T05:07:00+5:302015-03-12T05:07:00+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ आणि कुटुंबियांविरोधातील घोटाळ््यांच्या आरोपाच्या अनुषंगाने

Officials' inquiry into allegations against Bhujbal family members | भुजबळ कुटुंबीयांविरोधातील आरोपांबाबत अधिका-यांची चौकशी

भुजबळ कुटुंबीयांविरोधातील आरोपांबाबत अधिका-यांची चौकशी

googlenewsNext

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ आणि कुटुंबियांविरोधातील घोटाळ््यांच्या आरोपाच्या अनुषंगाने लाचलुचतप प्रतिबंधक विभागाने बुधवारी एस.एस. सोळंकी व अरूण देवधर यांची चौकशी केली.
सोळंकी हे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपसचिव आहेत तर देवधर सेवानिवृत्त मुख्य अभियंता, अशी माहिती एसीबीतून देण्यात आली. वरळी येथील मुख्यालयात एसीबीच्या विशेष तपास पथकाने दोन्ही अधिकाऱ्यांकडे दिल्लीतील महाराष्ट्र सदन घोटाळ््यासह अन्य आरोपांबाबत कसून चौकशी केल्याचे समजते. त्यानंतर त्यांचे जबाबही नोंदवून घेण्यात आले. या जबाबातून पुढे आलेल्या माहितीची शहानिशा करण्यासाठी भुजबळ व त्यांच्या कुटुंबियांकडे चौकशी केली
जाईल, असेही संकेत एसीबीने दिले आहेत.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उच्च न्यायालयात याचिका करून भुजबळ, कुटुंबिय, बांधकाम विभागाचे अधिकारी, भुजबळ यांच्या कंपन्यांचे चालक यांच्याविरोधात हजारो कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले. तसेच एसीबीकडून उघड चौकशीची मागणीही केली. न्यायलायाने एसीबीला उघड चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यानुसार एसीबीने २० फेब्रुवारीपासून उघड चौकशी सुरू केली. आत्तापर्यंत भुजबळ यांचे चिरंजीव पंकज, पुतणे समीर यांची चौकशी करण्यात आली. भुजबळ यांना मात्र अद्याप एसीबीने चौकशीला बोलावलेले नाही. (प्रतिनिधी)

Web Title: Officials' inquiry into allegations against Bhujbal family members

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.