‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे अधिकार्‍यांची साक्ष!

By Admin | Published: July 27, 2014 11:00 PM2014-07-27T23:00:28+5:302014-07-27T23:03:51+5:30

लाचखोरीच्या खटल्यांचा लवकर निपटारा करण्याचा प्रयत्न;विधी व न्याय विभागाची सूचना

Officials 'Video Conferencing'! | ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे अधिकार्‍यांची साक्ष!

‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे अधिकार्‍यांची साक्ष!

googlenewsNext

अकोला: लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी)ने केलेल्या कारवाईत सहभागी झालेल्या अधिकार्‍याची, त्या प्रकरणाची न्यायालयात सुनावणी सुरू होईपर्यंत इ तरत्र बदली झाल्यास, अशा अधिकार्‍याची साक्ष ह्यव्हिडीओ कॉन्फरन्सिंगह्णद्वारे नोंदविण्याची व्यवस्था करण्याची सूचना, विधी व न्याय विभागाने केली आहे.
एसीबीच्या कारवाईत सहभागी झालेल्या अधिकार्‍यांची बदली झाली, की ते आधी कार्यरत असलेल्या जिल्ह्यातील न्यायालयात साक्ष नोंदविण्यासाठी जाणे त्यांच्यासाठी अनेकदा गैरसोयीचे ठरते. त्यामुळे खटल्याचे कामकाज लांबते. ही वस्तुस्थिती ध्यानात घेऊन, एसीबीचे खटले या किरकोळ कारणाने प्रभावित होऊ नयेत, यासाठी विधी व न्याय विभागाने ही सूचना केली आहे.
लाचखोर सरकारी अधिकारी आणि कर्मचार्‍यांविरुद्ध एसीबीकडून कारवाई केली जाते. एसीबी गुन्ह्यांचा तपास करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करते; मात्र खटले लवकर निकाली निघत नाहीत. त्यामुळे न्यायालयात प्रलंबित असलेल्या खटल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अनेकवेळा साक्षीदारांअभावीही खटल्याची सुनावणी लांबत राहते.
लाचखोरीच्या खटल्यांमध्ये कारवाईत सहभागी असलेल्या अधिकार्‍यांचीही साक्ष नोंदविण्यात येते; मात्र कारवाईत सहभागी असलेल्या अधिकार्‍यांची बदली झाली, की नवीन ठिकाणच्या व्यस्ततेमुळे, साक्ष नोंदविण्यासाठी आधी कार्यरत असलेल्या जिल्ह्यातील न्यायालयात हजर होणे त्यांच्यासाठी अडचणीचे ठरते. परिणामी खटल्याचे कामकाज लांबते. या अडचणींचा विचार करून अधिकार्‍यांची साक्ष ह्यव्हिडीओ कॉन्फरन्सिंगह्णद्वारे नोंदविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यासाठी खटल्याशी संबंधित वकिलांनी साक्षीदार अधिकार्‍यांशी संपर्क साधून, त्यांची साक्ष नोंदविण्याची तारीख आणि वेळ निश्‍चित करावी आणि त्यांची साक्ष ह्यव्हिडीओ कॉन्फरन्सिंगह्णद्वारे नोंदविण्याची विनंती एसीबीने न्यायालयास करावी, असा आदेश विधी व न्याय विभागाने दिला आहे.

*२४८८ खटले प्रलंबित
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दाखल केलेले एकूण २,४९९ खटले राज्यभरा तील विविध न्यायालयांमध्ये ३0 जून २0१४पर्यंत प्रलंबित होते. मुंबई परिक्षेत्रातील १0२, ठाण्यातील ३५४, पुण्यातील ४३९, नाशिकमधील २९९, अमरावतीमधील २७३, औरंगाबादमधील ३३५ आणि नांदेड परिक्षेत्रातील २२१ खटले प्रलंबित आहेत.
*शिक्षेचे प्रमाण अल्प
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या खटल्यांमध्ये शिक्षा होण्याचे प्रमाण अल्प असल्याचे गत दोन वर्षांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास दिसून येते. २0१३ मध्ये एकूण ३८७ प्रकरणांपैकी ३0७ खटल्यांतील आरोपींची निर्दोष मुक्तता झाली, तर केवळ ८0 खटल्यांतील आरोपींना शिक्षा झाली. यावर्षी ३0 जूनपर्यंत १४१ प्रकरणांपैकी १0१ खटल्यांतील आरोपींची निर्दोष मुक्त करण्यात आली असून, ४0 खटल्यातील आरोपींना शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

Web Title: Officials 'Video Conferencing'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.