अबब..! लोकसभा निवडणुकीच्या काळात तब्बल साडेचार लाख लिटर मद्यसाठा जप्त 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2019 07:00 AM2019-05-25T07:00:00+5:302019-05-25T07:00:01+5:30

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना आकर्षित करण्यासाठी अनेक ठिकाणी मद्याचा वापर केला जातो....

ohh ..! During the Lok Sabha elections, nearly four lakh liters of liquor were seized | अबब..! लोकसभा निवडणुकीच्या काळात तब्बल साडेचार लाख लिटर मद्यसाठा जप्त 

अबब..! लोकसभा निवडणुकीच्या काळात तब्बल साडेचार लाख लिटर मद्यसाठा जप्त 

Next
ठळक मुद्देउत्पादनशुल्क विभागाची कारवाई दीड कोटी रुपयांचा साठा केला जप्त, साडेचारशे जणांवर गुन्हा दाखलजिल्ह्यात सर्वाधिक २४१ गुन्हे शिरुर लोकसभा मतदार संघात

पुणे : राज्य उत्पादनशुल्क विभागाने लोकसभा निवडणूक कालावधीत केलेल्या कारवाईत तब्बल ४ लाख ५९ हजार ९२८ लिटर मद्य साठा आणि मद्य तयार करण्याची रसायने जप्त केली आहेत. या प्रकरणी ४५७ जणांना अटक केली असून, तब्बल १ कोटी ६७ लाख ५२ हजार ९४८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना आकर्षित करण्यासाठी अनेक ठिकाणी मद्याचा वापर केला जातो. त्या पार्श्वभूमीवर उत्पादनशुल्क विभागाने जिल्ह्यातील बारामती, शिरुर, मावळ आणि पुणे या चारही लोकसभा मतदारसंघावर अवैध मद्य वाहतूकीवर करडी नजर ठेवली होती. तसेच, जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघ निहाय तपासणी मोहीमही राबविली होती. मार्च महिन्यापासून मतदानाच्या दिवसापर्यंत (दि. २३ मे) ही कारवाई सुरु होती.  
जिल्ह्यात सर्वाधिक २४१ गुन्हे शिरुर लोकसभा मतदार संघात असून, त्यातील ११७ गुन्हे शिरुर विधानसभा मतदार संघातील आहेत. सर्वाधिक २७ हजार ३२१ लिटर हातभट्टी जप्त करण्यात आली असून, मद्य तयार करण्याचे रसायनाचा तब्बल ४ लाख २४ हजार ८३७ लिटरचा साठा जप्त केला आहे. या शिवाय बीअर, विदेशी मद्य, ताडी, देशी मद्याचा साठा देखील जप्त केला आहे. मद्य वाहतूकीसाठी वापरलेल्या५४ वाहनांसह तब्बल १ कोटी ६७ लाख ५२ हजार ९४८ रुपयांचा साठा जप्त केला आहे. 
---
बारामती, शिरुरमध्ये सर्वाधिक कारवाई
बारामती लोकसभा मतदारसंघात २२५ गुन्हे दाखल असून, १२३ जणांना अटक झाली आहे. हातभट्टी १०, ३८२, रसायन १ लाख ६७ हजार ९००, देशी मद्य ३००, विदेशी मद्य १८२, २४३ लिटर बीअर आणि १२२२ लिटर ताडीचा साठा जप्त करण्यात आला आहे. या मतदारसंघातील भोर तालुक्यात सर्वाधिक ८८ गुन्हे दाखल आहेत. शिरुर लोकसभा मतदारसंघात २४१ गुन्हे दाखल असून, १३३ जणांना अटक झाली आहे. हातभट्टी ९,६४३, रसायन १,७२,३४६, देशी मद्य ४७७, विदेशी मद्य १५६, बिअर ३१७ आणि ताडीचा १,७९९ लिटर साठा जप्त करण्यात आला आहे. पुणे मतदारसंघात १३० गुन्हे दाखल असून, त्यातील ५७ गुन्हे  वडगावशेरीत नोंदविण्यात आले. 

Web Title: ohh ..! During the Lok Sabha elections, nearly four lakh liters of liquor were seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.