जागावाटपाबाबत जुना फॉम्यरुला योग्य!
By admin | Published: August 6, 2014 01:59 AM2014-08-06T01:59:41+5:302014-08-06T01:59:41+5:30
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी जो निर्णय घेतील,
Next
सेलू (जि. परभणी) : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी जो निर्णय घेतील, तो आम्हाला बंधनकारक असेल. आम्ही जुनाच फॉम्यरुला वापरण्याचा आग्रह करणो यात काहीच चूक नाही. जेव्हा काँग्रेसला लोकसभेत अधिक जागा होत्या, तेव्हा काँग्रेसने विधानसभेत जास्त जागा घेतल्या. आता आमच्या जागा लोकसभेत जास्त आहेत, तर आम्हाला जास्त जागा विधानसभेत मिळाल्याच पाहिजे, असा आग्रह राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मंगळवारी येथे धरला़
सेलू येथे मंगळवारी झालेल्या निर्धार मेळाव्यात ते बोलत होत़े याप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री सुरेश धस उपस्थित
होत़े तटकरे म्हणाले, पक्षाने शेतक:यांच्या, गोरगरीबांच्या हिताला नेहमीच प्राधान्य दिले.
केंद्रात शरद पवार कृषीमंत्री होते, तेव्हा महाराष्ट्रातील शेतक:यांना प्रश्न मांडण्यासाठी हक्काची जागा होती. आज ती जागा राहिली नाही आणि आता कोण कृषीमंत्री आहेत, हे कुणाला माहितीही नाही.
आतापर्यंत बळीराजावर आलेल्या वेगवेगळ्या संकटांच्या काळात पवार यांनी केंद्रातून राज्यासाठी मोठी मदत आणली. आता तशी परिस्थिती नाही. अच्छेदिन आनेवालेंच्या काळात राज्यातील शेतक:यांसाठी कोणी मदत करेल, अशी अपेक्षा उरलेली नाही, असे सांगून आघाडी सरकारने आतापर्यंत केलेले काम लोकांसमोर घेऊन जाण्याचे आवाहन त्यांनी कार्यकत्र्याना केल़े
तर मराठवाडय़ात अवर्षणासारखी परिस्थिती निर्माण होत आहे. पावसाचे प्रमाण यंदा कमी राहिले आहे. सरकार तातडीने यावर उपाययोजना जाहीर करेल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मेळाव्यात दिली़ (प्रतिनिधी)
च्जिल्हाधिकारी कार्यालयात होणा:या आढावा बैठकीस उपस्थित राहण्यासाठी मंत्र्यांच्या वाहनांचा ताफा वसमत रस्त्यावरुन निघाला. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ धनगर समाजातील कार्यकत्र्याचे आरक्षणाच्या मागणीसाठी बेमुदत उपोषण सुरू आहे. मंत्र्यांच्या वाहनांचा ताफा पुतळ्याजवळ आल्यानंतर आंदोलकांनी तो अडविला़ सर्वात पुढे पालकमंत्री सुरेश धस यांचे वाहन होते. या वाहनाला आंदोलकांनी गराडा घातल्याने गोंधळ उडाला.
च्पोलिस आंदोलकांना आवरत असतानाच एका कार्यकत्र्याने पायातील बूट काढून मंत्र्यांच्या वाहनावर भिरकावला. हा बूट पालकमंत्री सुरेश धस यांच्या गाडीवर पडला. बूट फेकणा:या माणिक ढाकरगे याला पोलिसांनी त्यास अटक केली आहे. या सर्व प्रकारानंतर पोलिसांनी पालकमंत्र्यांची गाडी विरुद्ध बाजूने पुढे काढून दिली. त्यांच्या पाठीमागेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची गाडी होती. ही गाडीही आंदोलकांनी अडविली. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. काही काळ तणावाची स्थितीही निर्माण झाली. या घटनेनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गाडीवरच बूट फेकल्याची चर्चा शहरात झाली होती.
निर्धार मेळाव्याचा
दुसरा टप्पा
च्1क् ऑगस्टला पुणो, 11 रोजी
सांगली आणि रत्नागिरी, 12 रोजी गडचिरोली, 16 रोजी बुलडाणा
आणि वाशिम आणि 17 रोजी रायगड येथे हे निर्धार मेळावे होणार आहेत़
पहिला टप्पा संपला
च्पालघर येथून एक जुलैपासून सुरू झालेल्या या निर्धार मेळाव्यांमध्ये पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिलंमध्ये कार्यकत्र्याशी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संवाद साधला.
मंत्र्यांच्या ताफ्यावर बूट फेकला
च्सेलू येथील निर्धार मेळाव्यासाठी परभणीत आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल राज्यमंत्री सुरेश धस यांची वाहने अडवून एका आंदोलकाने बूट भिरकावल्याचा प्रकार मंगळवारी सकाळी 1क् च्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ घडला़ यामुळे काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती.