वृद्ध महिलेचे अपहरण करणारा अटकेत, महिलेचा शोध सुरू
By Admin | Published: February 5, 2017 03:47 PM2017-02-05T15:47:32+5:302017-02-05T15:47:32+5:30
नातेवाईकाचे लग्न आटोपून समतानगर येथे जाण्यास निघालेल्या वृद्ध महिलेचे अपहरण करणा-या एका संशयिताला पुंडलिकनगर पोलिसांनी अटक केली.
>ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 5 - नातेवाईकाचे लग्न आटोपून समतानगर येथे जाण्यास निघालेल्या वृद्ध महिलेचे अपहरण करणा-या एका संशयिताला पुंडलिकनगर पोलिसांनी अटक केली. २७ जानेवारी रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास पुंडलिकनगर पाण्याच्या टाकीजवळ हे अपहरण झाले. महिलेजवळ रोख २४ हजार रुपये आणि दिड तोळ्याचे दागिने होते. हा ऐवज लुटण्यासाठी हे अपहरण झाल्याचा संशय पोलिसांना आहे.
नजीर सांडू पटेल(४०,रा. निर्मलनगर, मुकुंदवाडी)असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. सरस्वती रुंजाजी गवळी(६५,रा.समतानगर) असे अपहरण झालेल्या वृद्धेचे नाव आहे. पोलिसांनी सागिंतले की, समतानगर येथील निवासी राहुल रुंजाजी गवळी यांच्या नातेवाईकाचे पुंडलिकनगर परिसरातील न्यू हनुमाननगर येथे विवाह होता. या विवाहसाठी राहुल, त्यांची आई-वडिल,भाऊ आणि अन्य नातेवाईक उपस्थित होते. लग्नाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर त्यांचे वडिल, भाऊ हे घरी गेले. राहुल आणि त्याची आई मागे थांबले होते. काही वेळानंतर तते सोबत घरी जाणार होते. रात्री साडेनऊ ते पावणे दहा वाजेच्या सुमारास सरस्वती यांनी मी पुढे पायी जाते असे राहुलला सांगून त्या निघाल्या. पुंडलिकनगर पाण्याच्या टाकीजवळून त्या जात असताना अचानक गायब झाल्या.
त्यानंतर दहा मिनिटाने पाहुण्याच्या घरीहून निघालेला राहूल रोडवर आला. तेथे त्यास आई दिसली नाही.यामुळे आई घरी गेली असेल असे समजून तो थेट घरी गेला तेव्हा आई घरी आली नसल्याचे त्यांना नातेवाईकांना सांगितले. यामुळे तो पुन्हा परत आला आणि पुंडलिकनगर, हनुमानगर येथील नातेवाईकांकडेही शोध घेतला परंतु सरस्वती भेटल्या ननाही.शेवटी दुसºया दिवशी त्यांनी पुंडलिकनगर पोलीस चौकीत सरस्वती हरवल्याची तक्रार नोंदविली. आईचा शोध घेत असताना निर्मलनगर भागातील एका जणासोबत तुमची आई पाहिल्याची माहिती त्यांना दिली. त्यामुळे राहुल यांनी पोलिसांना सोबत घेऊन त्या आरोपीच्या घरी सरस्वती यांचा शोध घेतला असता तेथे त्यांना त्यांच्या चपला आढळल्या. आरोपी हा घरी नव्हता. त्याच्या पत्नीने महिला घरी आली होती आणि तिच्यापतीने त्यांना सोबत नेल्याचे तिने पोलिसांना सांगितले. दोन दिवसानंतर नजीर हा पोलिसांच्या हाती लागला. त्यावेळी त्याने सरस्वती यांना त्याने रेल्वेने मनमाड रेल्वेस्थानकावर नेऊन सोडल्याची कबुली दिली.
त्याच्या सांगण्यानुसार पोलीस नजीर यास सोबत घेऊन मनमाड येथेही जाऊन आले. परंतु तेथेही सरस्वती आढळल्या नाही. शेवटी राहुलने दिलेल्या तक्रारीवरुन नजीरला पोलिसांनी अटक केली.