वृद्ध वडिलास दरमहा ७५00 निर्वाह भत्ता द्या!

By admin | Published: December 25, 2015 03:15 AM2015-12-25T03:15:30+5:302015-12-25T03:29:52+5:30

उपविभागीय दंडाधिका-यांचा पीडिताच्या मुलाला आदेश;अशाप्रकारची पहिलीच सुनावणी.

Older father gets 7500 allowance per month! | वृद्ध वडिलास दरमहा ७५00 निर्वाह भत्ता द्या!

वृद्ध वडिलास दरमहा ७५00 निर्वाह भत्ता द्या!

Next

अकोला : मुलाने लग्नानंतर अपमानास्पद वागणूक दिल्यामुळे घर असूनही निरा२िँं१्रूँं१तासारखे मंदिरात राहणार्‍या वृद्ध वडील व कुटुंबीयांना दरमहा ७५00 रुपये निर्वाह भत्ता द्यावा, असा आदेश तक्रारकर्त्या वडिलांच्या मुलास अकोला उपविभागीय अधिकारी संजय खडसे यांनी बुधवारी दिला. ज्येष्ठ नागरिकसंरक्षण कायदा २00७ अंतर्गत दाखल करण्यात आलेल्या तक्रारीवर झालेल्या सुनावणीनंतर त्यांनी हा आदेश पारित केला. अकोला तालुक्यातील गोरेगाव येथील जगतराव मोतीराम बाजड (८२) हे त्यांची पत्नी व मतिमंद मुलीसह गजानन महाराज मंदिरात राहतात. मुलगा अरुण याने लग्नानंतर अपमानास्पद वागणूक देऊन घर सोडण्यास भाग पाडल्याने आपणास मंदिरात राहावे लागत असल्याची तक्रार जगतराव बाजड यांनी ज्येष्ठ नागरिक संरक्षण कायदा २00७ नुसार उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडे केली होती. अरुण बाजड हे छत्तीसगड येथील भिलाई स्टिल प्लांटमध्ये मोठय़ा पदावर कार्यरत असतानाही, ते वडीलांना उदरनिर्वाहाकरिता १५00 रुपये महिना एवढी तुटपुंजी रक्कम देत होते. या रकमेत उदरनिर्वाह होत नसल्याचे बाजड यांनी तक्रारीत म्हटले आहे. बुधवारी या तक्रारीवर येथील उपविभागीय अधिकारी संजय खडसे यांच्या कार्यालयात सुनावणी करण्यात आली. यावेळी प्रा. खडसे यांनी जगतराव बाजड यांचा मुलगा अरुण बाजड यांना वडिलांना दरमहा ७५00 रुपये निर्वाह भत्ता देण्याचा आदेश दिला. अरुण बाजड यांनी त्यांच्या वडिलांना निर्वाह भत्ता दिला नाही, तर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही उपविभागीय अधिकार्‍यांनी दिला आहे.

Web Title: Older father gets 7500 allowance per month!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.