वृद्धाच्या दशक्रिया विधीसाठी तरुणाईने जमा केली लोकवर्गणी

By admin | Published: January 3, 2017 10:13 PM2017-01-03T22:13:30+5:302017-01-03T22:13:30+5:30

मुलगा नसलेल्या वृद्धाचा तरुण मंडळींनी एकत्र येत २० हजार रुपये लोकवर्गणी जमा करून त्यांच्या दशक्रिया विधीचा कार्यक्रम केला.

Older people gathered for the dasakriya rituals | वृद्धाच्या दशक्रिया विधीसाठी तरुणाईने जमा केली लोकवर्गणी

वृद्धाच्या दशक्रिया विधीसाठी तरुणाईने जमा केली लोकवर्गणी

Next

रवींद्र सूर्यवंशी/  ऑनलाइन लोकमत 
जैताणे (धुळे), दि. 3 -  जिवंतपणी अत्यंत काबाडकष्ट करून पदरी पडलेले अठराविश्व दारिद्य्राशी संघर्ष करणाऱ्या नामदेव भगवान माळी या वृद्धाचे २८ डिसेंबरला निधन झाले. त्यांना मुलगा नसल्याने त्यांचा अंत्यविधीसाठी साक्री तालुक्यातील तरुण मंडळींनी एकत्र येत २० हजार रुपये लोकवर्गणी जमा करून त्यांच्या दशक्रिया विधीचा कार्यक्रम केला.
शिंदखेडा तालुक्यातील दाऊळ येथील त्यांच्या भाऊबंदकीतील एका मुलाच्या हस्ते त्यांच्या दशक्रिया विधीचा कार्यक्रम पार पडला. नामदेव माळी यांच्या निधनानंतर त्यांच्या घरात पैशाची एकही दमडीही नव्हती. त्यामुळे त्यांचा दशक्रिया विधीचा कार्यक्रम त्यांच्या दशक्रिया विधीचा प्रश्न उपस्थित झाला होता. तेव्हा जैताणे येथील चावडी चौक मित्र मंडळ, शिवाजी व्यायाम शाळा मित्र मंडळ व सरपंच संजय खैरनार, मोहन गायकवाड, धंजी जाधव, बापू बोरसे, गोकूळ पाटील यांनी परिसरातून वर्गणी गोळा करून केली. नामदेव माळी हे मूळचे दाऊळ येथील होते. मात्र, गेल्या २८ वर्षांपासून जैताणे येथे ते राहत होते. शरीरात शक्ती असे पर्यंत ते व त्यांची पत्नी गंगाबाई काबाडकष्ट करून उदरनिर्वाह करीत होते. परंतु, त्यांचे हातपाय थकल्यानंतर नामदेव माळी हे जैताणे येथील संत सावता मंदिर येथे सेवेकरी म्हणून काम करीत होते. पहाटे ४ वाजेपासून ते देवाच्या आराधनेत तल्लीन असायचे. त्यांच्या पत्नीला कॅन्सर या दुर्धर रोगाने ग्रासले होते. त्यांनाही चालता येत नव्हते. ही मोठी अडचण त्यांच्यासमोर असताना अचानक त्यांचे निधन झाल्याने त्यांच्या पत्नीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मृत्यूनंतर त्यांच्या मृतदेहाची हेळसांड होऊ नये, म्हणून संवेदनशील युवकांनी लोकवर्गणीतून त्यांचा अंत्यविधी केला.

Web Title: Older people gathered for the dasakriya rituals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.