औरंगाबाद महापालिकेत झुंडशाही; महापौरांवर खुर्च्या फेकणा-या एमआयएमच्या दोन नगरसेवकांचे सभासदत्व कायमचे रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 03:55 PM2017-10-16T15:55:54+5:302017-10-16T16:24:42+5:30

महापालिकेच्या सर्वसधारण सभेत पाण्याच्या प्रश्नावरून एमआयएम च्या नगरसेवकांनी अभूतपूर्व गोंधळ घालत सभागृहात खुर्च्या भिरकावल्या. यातच महापौरांसमोर जात सुरक्षा रक्षकाला मारहाण केली यावेळी दोन खुर्च्या  महापौरांना लागल्या. गोंधळ घालणा-या दोन नगरसेवकांचे  सदस्यत्व कायमस्वरूपी रद्द करण्यात आल आहे.

Ombudsman in Aurangabad Municipal Corporation; Membership of two MIM corporators, who throw chairs on the mayor, will be canceled forever | औरंगाबाद महापालिकेत झुंडशाही; महापौरांवर खुर्च्या फेकणा-या एमआयएमच्या दोन नगरसेवकांचे सभासदत्व कायमचे रद्द

औरंगाबाद महापालिकेत झुंडशाही; महापौरांवर खुर्च्या फेकणा-या एमआयएमच्या दोन नगरसेवकांचे सभासदत्व कायमचे रद्द

googlenewsNext
ठळक मुद्देसर्वसाधारण सभेत पाणी प्रश्नांवर एमआयएम च्या नगरसेवकांनी गोंधळ घातला.

औरंगाबाद : महापालिकेच्या सर्वसधारण सभेत पाण्याच्या प्रश्नावरून एमआयएम च्या नगरसेवकांनी अभूतपूर्व गोंधळ घालत सभागृहात खुर्च्या भिरकावल्या. यातच महापौरांसमोर जात सुरक्षा रक्षकाला मारहाण केली यावेळी दोन खुर्च्या  महापौरांना लागल्या. गोंधळ घालणा-या दोन नगरसेवकांचे  सदस्यत्व कायमस्वरूपी रद्द करण्यात आल आहे.  

महापालिकेच्या सर्वसधारण सभेत पाण्याच्या प्रश्नावरून सभागृहात खुर्च्या भिरकाणार्या एमआयएच्या तीन नगरसेवकांनी गोंधळ घालत खुर्च्या फेकल्या.दोन खुच्या महापौरांना लागल्या. औरंगाबाद महानगरपालिकेचे महापौर भगवान घडमोडे यांचा कार्यकाळ संपत आहे. त्यांची ही शेवटची  सर्वसाधारण सभा होती. शहरातील पाणी प्रश्नावर सर्वपक्षीय नगरसेवक जाब विचारत असताना. नियमित पाणी पुरवठा व्हावा अशी मागणी करण्यात आली. जेवढी वसुली होते त्या पद्धतीनं पाणी पुरवठा व्हावा असं शिवसेने कडून सूचित करण्यात आलं, त्यावर एम आयआम कडून आक्षेप घेण्यात आला. यावेळी शाब्दिक बाचाबाची झाली.  

यातच एमआयएम नगरसेवक राजदंड पळवण्यासाठी पुढे आल्यान सुरक्षारक्षक पुढे सरसावले. त्यावेळी एमआयएम नगरसेवक सय्यद मतीनं आणि जफर बिल्डर यांनी त्यांना पाठीमागे लोटत खुर्च्या फेकल्या. झटपट सूरु असताना महापौर आसन सोडून सुरक्षा रक्षकाकडे गेले असता फेकलेली खुर्ची त्याच्या अंगावर पडली.

नगरसेवकपद कायमसाठी रद्द 
जफर बिल्डर आणि सययद मतीनं यांचं नगरसेवकपद कायमसाठी रद्द करण्यात आलं आहे. यापूर्वीही वंदेमातरम वरून पालिकेत जो राडा झाला होता. त्यामध्ये हे दोन्ही नगरसेवक आघाडीवर होते. त्यावेळी सभागृहाची तोडफोड केल्यामुळे एक दिवसासाठी त्यांच सदस्यत्व रद्द करण्यात आलं होतं. 

Web Title: Ombudsman in Aurangabad Municipal Corporation; Membership of two MIM corporators, who throw chairs on the mayor, will be canceled forever

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.