Gold Rates: बाबो! सोन्याची नव्या विक्रमाकडे झेप; 1400 रुपयांची वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2020 04:37 AM2020-07-30T04:37:59+5:302020-07-30T04:38:26+5:30
दलालांनी चांदीपेक्षा सोन्याकडे कल वाढविल्याने हा परिणाम झाल्याचे सांगण्यात येत आहे. कोरोनाच्या स्थितीमुळे विदेशी बँकांनी व्याजदर घटविल्याने सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने-चांदीकडे कल वाढल्याचे चित्र आहे.
जळगाव : सोन्याचे भाव वाढतच असून, बुधवारी त्यात १४०० रु पयांनी वाढ झाली आहे. यामुळे सोने ५४ हजार ९०० रु पये प्रतितोळा होऊन ५५ हजाराच्या उंबरठ्यावर पोहोचले आहे. चांदीत मात्र १३०० रुपयांनी घसरण होऊन ती ६६ हजार २०० रुपये प्रतिकिलोवर आली.
दलालांनी चांदीपेक्षा सोन्याकडे कल वाढविल्याने हा परिणाम झाल्याचे सांगण्यात येत आहे. कोरोनाच्या स्थितीमुळे विदेशी बँकांनी व्याजदर घटविल्याने सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने-चांदीकडे कल वाढल्याचे चित्र आहे.
जुलैच्या पहिल्या आठवड्यात सोने ४९,२००वर होते. त्यानंतर २८ रोजी अडीच हजार रुपयांनी वाढ होऊन ते ५३ हजार ५०० रुपयांवर पोहोचले. आज आणखी १४०० रुपयांची वाढ झाली. चांदीमध्येदेखील गेल्या अनेक दिवसांपासून वाढ सुरू आहे.
जागतिक पातळीवर सोन्याची खरेदी वाढतच असल्याने भाव सातत्याने वाढत आहे. मागणी जास्त व आवक कमी अशी स्थिती असल्याचा हा परिणाम आहे.
- सुशील बाफना,
सुवर्ण व्यावसायिक