Omicron Variant: १ डिसेंबरपासून पहिली ते आठवी शाळा सुरु; ठाकरे सरकारने जारी केली नियमावली

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2021 07:34 PM2021-11-29T19:34:28+5:302021-11-29T19:35:02+5:30

राज्यात येत्या १ डिसेंबर पासून पहिलीपासून शाळा सुरू करण्यास शालेय शिक्षण विभागाने मान्यता दिली असून यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

Omicron Variant: 1st to 8th school starts from 1st December; Rules issued by Thackeray government | Omicron Variant: १ डिसेंबरपासून पहिली ते आठवी शाळा सुरु; ठाकरे सरकारने जारी केली नियमावली

Omicron Variant: १ डिसेंबरपासून पहिली ते आठवी शाळा सुरु; ठाकरे सरकारने जारी केली नियमावली

googlenewsNext

मुंबई – ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने विशेष खबरदारी घेतली आहे. परदेशातून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशांची कठोर तपासणी केली जात आहे. केंद्राच्या सूचनांची वाट न पाहता तातडीने कामाला लागा. लॉकडाऊन नको असेल तर आरोग्य बंधनं पाळावीच लागतील अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या होत्या. नव्या व्हेरिएंटमुळे शाळा सुरु करण्याच्या निर्णयावर सध्या राज्य सरकारने वेट अँन्ड वॉचची भूमिका घेतली आहे. त्यामुळे येत्या १ डिसेंबरपासून राज्यात पहिलीपासून शाळा सुरु होणार आहेत.

राज्यात येत्या १ डिसेंबर पासून पहिलीपासून शाळा सुरू करण्यास शालेय शिक्षण विभागाने मान्यता दिली असून यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. सर्व शाळांनी या सूचनांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी केले आहे. यासंदर्भातील शासन परिपत्रक आज जारी करण्यात आले आहे.

काय आहे नियमावली?

शाळा सुरू करण्यापूर्वी आरोग्य, स्वच्छता आणि इतर सुरक्षाविषयक उपाययोजनांना प्राधान्य देण्यात आले आहे. या मार्गदर्शक सूचनांनुसार संबंधित शाळेतील शिक्षक/ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कोविड लसीकरण (दोन लसी) झालेल्यांनाच शाळा/ कार्यालयामध्ये प्रवेश देण्यात यावा.

सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कोविड-19 साठीची ४८ तासापूर्वीची आरटीपीसीआर चाचणी करावी.

विद्यार्थ्यांचे नाक व तोंड मास्कने पूर्णत: झाकलेले असले पाहिजे याबाबत विद्यार्थ्यांना सातत्याने सांगावे.

शाळेतील परिपाठ, स्नेह संमेलन व इतर तत्सम कार्यक्रम ज्यामुळे अधिक गर्दी होऊ शकते अथवा स्पर्श होईल अशा कार्यक्रमांच्या आयोजनावर कडक निर्बंध असेल.

शिक्षक-पालक बैठका देखील शक्यतो ऑनलाईन घ्याव्यात. शाळेत हात धुण्यासाठी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.

वर्गामध्ये एका बाकावर एक विद्यार्थी याप्रमाणे बैठक व्यवस्था असावी. विद्यार्थ्यांनी शाळेत उपस्थित राहण्यापूर्वी त्यांच्या पालकांची संमती आवश्यक असणार आहे.

शाळा सुरू झाल्यानंतर करावयाच्या उपाययोजनांबाबत देखील विभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यानुसार शाळेत व परिसरात स्वच्छता व आरोग्यदायी परिस्थिती राखावी.

सर्व शाळा आरोग्य केंद्राशी संलग्न कराव्यात. यासाठी इच्छुक डॉक्टर पालकांची मदत घेण्यात यावी. जास्त विद्यार्थी असलेल्या शाळा दरदिवशी दोन सत्रांमध्ये भरविण्यात याव्यात.

विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी यांची दररोज थर्मल स्क्रिनिंग चाचणी घेण्यात यावी. सद्यस्थितीत पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचे कोणत्याही प्रकारचे खेळ घेण्यात येऊ नयेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी वाहनचालक व मदतनीस यांचे १०० टक्के लसीकरण झालेले असावे. 

उपरोक्त सूचनांव्यतिरिक्त स्थानिक परिस्थितीनुसार शाळांनी आवश्यक मार्गदर्शक तत्वे, सूचना निश्चित करावीत व प्रभावी अंमलबजावणी करावी. तसेच शासनाने कोविड-19 संदर्भात वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे देखील पालन करण्यात यावे, असेही या मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद करण्यात आले आहे.

Web Title: Omicron Variant: 1st to 8th school starts from 1st December; Rules issued by Thackeray government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.