ऐन दिवाळीत बळीराजा संकटात; कागदी घोडे न नाचवता शेतकऱ्यांना मदत करा- जयंत पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2024 12:18 PM2024-10-29T12:18:23+5:302024-10-29T12:19:21+5:30
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडून सरकारची कानउघडणी
Jayant Patil vs Mahayuti: यावर्षी मान्सून समाधानकारक बरसल्याने खरीप पिके जोमाने आली आहेत. सोयाबीन, भात, भुईमूग या पिकांना पोषक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साह होता. मात्र, परतीचा पाऊस वेळेत परतेल, अशी शक्यता असताना त्यात अवकाळी पावसाची भर पडल्याने हाता-तोंडाशी आलेली पिके उद्ध्वस्त झाली. संपूर्ण राज्यात अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. ऐन सणासुदीला शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झाले आहे. पण सरकारकडून कोणतीही मदत जाहीर झाली नाही. या महत्त्वाच्या विषयांत लक्ष घालून कागदी घोडे न नाचवता शेतकऱ्यांना मदत करा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली.
परतीच्या पावसाने राज्यातील जवळपास १९ लाख हेक्टर वरील पिकांचे नुकसान झालेले असताना राज्यातील सत्ताधारी मात्र सत्ता परत मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न करण्यात व्यस्त आहेत.
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) October 29, 2024
दिवाळीची सुरुवात झालेली असताना राज्यातील बळीराजा मात्र संकटात आहे. सत्ताधाऱ्यांनी कागदी घोडे न नाचवता त्वरित…
"परतीच्या पावसाने राज्यातील जवळपास १९ लाख हेक्टर वरील पिकांचे नुकसान झालेले असताना राज्यातील सत्ताधारी मात्र सत्ता परत मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न करण्यात व्यस्त आहेत. दिवाळीची सुरुवात झालेली असताना राज्यातील बळीराजा मात्र संकटात आहे. सत्ताधाऱ्यांनी कागदी घोडे न नाचवता त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात मदत कशी जमा होईल हे पाहायला हवे," असेही पाटील आपल्या सोशल मीडिया हँडलवरून प्रतिक्रिया देताना म्हणाले.