राज्यभरात तीव्र संताप; गर्भवती महिला वनरक्षकाला मारहाण करणाऱ्याला २२ पर्यंत कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2022 06:50 AM2022-01-21T06:50:28+5:302022-01-21T06:50:51+5:30
घटनेने राज्यभरात तीव्र संताप व्यक्त
- प्रगती जाधव पाटील
सातारा : पळसावडे, (ता. सातारा) येथे गर्भवती महिला वनरक्षक व तिच्या पतीला मारहाण करणाऱ्या माजी सरपंचासह त्याच्या पत्नीला अटक केली असून त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता २२ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. दरम्यान, या घटनेने राज्यभरात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. रामचंद्र गंगाराम जानकर व प्रतिभा जानकर (दोघे रा. पळसावडे) असे अटक करण्यात आलेल्या दाम्पत्याचे नाव आहे.
कठोर कारवाई करणार : ठाकरे
राज्यात अशा घटना सहन केल्या जाणार नाहीत. संशयितांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल, असे राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले.
nरामचंद्र जानकर हा माजी सरपंच आहे. याप्रकरणी वनरक्षक सिंधू बाजीराव सानप (रा. दिव्यनगरी, सातारा) यांनी सातारा तालुका
पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. आम्हाला पदमुक्त करावे अशी भावना लाेकमतशी बाेलताना व्यक्त केली.