‘त्या’ गावगुंड मोदीचा थांगपत्ता लागेना; पटोलेंच्या विरोधात राज्यात ठिकठिकाणी भाजपचे आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2022 08:29 AM2022-01-19T08:29:33+5:302022-01-19T08:29:54+5:30
गावगुंड असलेल्या माेदीचा भंडारा जिल्ह्यात कुठेही तपास लागलेला नाही.
मुंबई : ‘मी मोदीला मारू शकतो आणि शिव्याही देऊ शकतो’ या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वक्तव्याविरोधात मंगळवारी भाजपने राज्यभरात तीव्र आंदोलन केले. पटोलेंवर कारवाईच्या मागणीसाठी भाजप नेत्यांनी राज्यपालांना निवेदन दिले, तर दाव्यानुसार गावगुंड असलेल्या माेदीचा भंडारा जिल्ह्यात कुठेही तपास लागलेला नाही. व्हिडिओत दिसणाऱ्या कार्यकर्त्यांचे जबाब नोंदवून घेण्यात आले. कुणालाही अटक केली नाही.
पटोलेंवर कारवाई न झाल्यास महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा मुंबई भाजप अध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांनी दिला आहे. नाना पटोले यांच्याविरोधात भाजप कार्यकर्त्यांनी मुंबईत आंदोलन केले. कांदिवलीत पटोले यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळला. पोलिसांनी आ. अतुल
भातखळकर यांना ताब्यात घेतले होते.
‘पॉझिटिव्ह’ आमदार आंदोलनात
नागपुरातील आंदोलनात १३ जानेवारीला कोरोनाची लागण झालेले पूर्व नागपूरचे आ. कृष्णा खोपडे हे विलगीकरण सोडून चक्क आंदोलनात उतरले. त्यावरून वाद झाला.
नाना पटोले यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल झालाच पाहिजे. त्यांनी पंतप्रधान मोदींबाबत केलेल्या विधानावर आता आम्ही शांत बसणार नाही.
- देवेंद्र फडणवीस,
विधानसभेचे विरोधी पक्षनेते