"या राज्यात एका जातीच्या बळावर...!", मनोज जरांगे यांचं मोठं विधान; असं जुळवणार राजकीय समीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2024 01:47 PM2024-10-24T13:47:13+5:302024-10-24T13:48:31+5:30

मराठ्यांची ताकद असेल त्याठिकाणी उमेदवार देणार असे जरांगे यांनी म्हटले होते. तत्पूर्वी, 288 मतदार संघात तयारी करा, असेही जरांगे यांनी म्हटले होते. मात्र आता...

"On the power of one caste in this state...!", Moj Jarange's big statement; That will match the political equation | "या राज्यात एका जातीच्या बळावर...!", मनोज जरांगे यांचं मोठं विधान; असं जुळवणार राजकीय समीकरण

"या राज्यात एका जातीच्या बळावर...!", मनोज जरांगे यांचं मोठं विधान; असं जुळवणार राजकीय समीकरण

राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. सर्व पक्ष आपापली गणितं, समीकरणं जुळवताना दिसत आहेत. दरम्यान, मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटी येथून विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभे करण्याची मोठी घोषणा केली होती. मराठ्यांची ताकद असेल त्याठिकाणी उमेदवार देणार असे जरांगे यांनी म्हटले होते. तत्पूर्वी, 288 मतदार संघात तयारी करा, असेही जरांगे यांनी म्हटले होते. मात्र आता, "एका जातीच्या बळावर या राज्यात कुणीच निवडणुका जिंकू शकत नाही," असे मोठे विधान जरांगे यांनी केले आहे. तसेच, सर्वांना सोबत घेऊन राजकीय समीकरणांची जुळवाजुळव करणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. ते अंतरवली सराटी येथे माध्यमांसोबत बोलत होते.

काय म्हणाले जरांगे...? -
जरांगे  म्हणाले, "मराठा समाजाच्या चळवळीत  प्रत्येकाचे योगदान आहे. त्यामुले मी प्रयत्न करणार आहे. मात्र मी माझे मत त्यांच्यावर लादनार नाही. समजावून सांगेन. कुणाला तरी एकाला उबे रहावे लागणार आहे. मात्र त्यांनी नाहीच एकले, तर मी त्यांच्यावर नाराजही होणार नाही आणि रुसणारही नाही. मात्र एक जबाबदारी म्हणून मी आज सर्वांना समजावण्याचा प्रयत्न करणार आहे. आता जिल्हानिहाय बैठकीला सुरुवात करत आहे. आता आम्ही जागलो तर पुढील पाच वर्ष गरिबांना न्याय मिळणार आहे. आपल्या समाजाचे मोठे योगदान आहे. आपला समाज पाठीशी उभा राहिला आहे. त्यंना जर आनंदी ठेवायचे असेल, सुखी ठेवायचे असेल तर, हे आता हे 30-40 जिवस आपण कष्ट केले, तर पुढेच पाच वर्ष गोर गरीब जनता ओबीसी असो अथवा अठरा पगड जातीची असो सुखी राहणार आहे. शेतकरी आनंदी राहणार आहेत."

तुम्हीच जर उभे राहण्याचा हट्ट धरला, तर...
"हे गोर गरीब जर सत्तेत गेले तर गरिबांचे प्रश्न मिटणार आहेत. श्रीमंतांचे प्रश्न मिटले काय आणि न मिटले काय त्यांना काही फरक पडत नाही. हेच मी सर्व इच्छुकांना समजावून सांगणार आहे आणि तुम्हीच जर उभे राहण्याचा हट्ट धरला, तर ना तुमचे स्वप्न पूर्ण होईन ना त्या गोर गरीब जनतेचे स्वप्न पूर्ण होईल. माझ्या गोर गरिबांचे वाटोळे होऊ नये, कारण ती गोरगरीब जनताच तुम्हाला मतदान करणार आहे. पण तुम्ही उभेच राहण्याचा हट्ट धरला, तर तुम्ही तो गोरगरिबांसाठी करत नाही, तर राजकीय स्वार्थासाठी करत आहात, असा त्याचा अर्थ होईल. तुम्हाला एक दिल्यावर सर्वजण त्याच्या पाठीशी उभे राहिले, तर त्याचा अर्थ असा होतो की, तुम्हाला गरिबांसाठी काम करायचे आहे," असेही जरांगे म्हणाले.

चार-पाच जणांनी फऑर्म भरून ठेवायचे अन्... 
आज आम्ही उमेदवार ठरवण्याचा प्रयत्न करणार आहोत, याशिवाय, किती मतदार संघ लढायचे आहे, यावरही आमची चर्चा होणार मात्र ते आता जाहीर करणार नाही. कारण आम्हाला त्यांची यादी बघायची आहे. या दोगांचीही यादी बघून आम्हीही ठवणार. त्यामुळे मतदार संघ सांगणार नाही. मात्र, चार-पाच जणांनी फऑर्म भरून ठेवायचे. वेळ प्रसंगी जे मतदारसंघ लढायचे नाही, ते फॉर्म मागे घ्याचे. 29-30 तारखेला सर्वांचे फोर्म भरायचे झाले की, की एखादवेळ मतदारसंघ आणि उमेदवार सांगू," असेही जरांगे यावेळी म्हणाले. 

एका जातीच्या बळावर या राज्यात कुणीच निवडणुका जिंकू शकत नाही -
"उद्यापासून तीन दिवस मी इतरांचे समीकरण जुळवणार आहे. कारम मी पूर्वीच सांगितले आहे की, एका जातीच्या बळावर या राज्यात कुणीच निवडणुका जिंकू शकत नाही. मग तुम्ही कितीही उड्या मारा. कुणीच नाही जिंकू शकत. त्याला समीकरणंच जुळलेली हवीत. नसता उगाच अपमान करायला... तसे तर मी माागेही बरीच समीकरणे जुळवली आहेत. पण 25,26 आणि 27 तारकेला मी तेही काम करणार आहे. सर्व छोट्या छोट्या जाती, जसे मायक्रो ओबीसी, दलीत, मुस्लीम, या सर्व गोरगरिबांचे समीकरण आपण जुळवणार आहोत."

   

Web Title: "On the power of one caste in this state...!", Moj Jarange's big statement; That will match the political equation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.