उद्धव ठाकरे यांच्या भावी मुख्यमंत्री बॅनरवरून फडणवीसांचा खोचक टोला, म्हणाले,"त्या शुभेच्छा…”

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2024 11:57 PM2024-07-26T23:57:40+5:302024-07-26T23:58:22+5:30

Devendra Fadnavis News:

On Uddhav Thackeray's future Chief Minister banner, Fadnavis' scornful gang said, "Good luck..." | उद्धव ठाकरे यांच्या भावी मुख्यमंत्री बॅनरवरून फडणवीसांचा खोचक टोला, म्हणाले,"त्या शुभेच्छा…”

उद्धव ठाकरे यांच्या भावी मुख्यमंत्री बॅनरवरून फडणवीसांचा खोचक टोला, म्हणाले,"त्या शुभेच्छा…”

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा शनिवारी वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने त्यांना राज्यातील नेतेमंडळींसह विविध क्षेत्रामधून शुभेच्छा दिल्या जात आहेत. काही ठिकाणी उद्धव ठाकरे यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनरसुद्धा लागले आहेत. दरम्यान, एकेकाळचे उद्धव ठाकरेंचे महायुतीमधील सहकारी आणि सध्याचे कट्टर विरोधक देवेंद्र फडणवीस यांनीही उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सोबतच भावी मुख्यमंत्री म्हणूल लागलेल्या बॅनरवरून खोचक टोलाही लगावला आहे. 

देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना म्हणाले की, उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या नेहमीच शुभेच्छा असतील. वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याच पाहिलेत. आम्ही एकमेकांचे शत्रू थोडेच आहोत. राजकीय विरोधक आहोत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना माझ्याकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा आहेत. बाकी गोष्टींच्या शुभेच्छा कुणी कुणाला द्यायच्या हे पाहूच. त्या शुभेच्छा केवळ जनताच देऊ शकते, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपा आणि शिवसेनेचं महायुतीचं सरकार सत्तेवर असताना देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये चांगला समन्वय दिसून येत होता. मात्र २०१९ मध्ये मुख्यमंत्रिपदावरून वाद होऊन उद्धव ठाकरे हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेल्यापासून दोन्ही नेत्यांमध्ये राजकीय वितुष्ट आलेलं आहे. तसेच दोघेही एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत.  

Web Title: On Uddhav Thackeray's future Chief Minister banner, Fadnavis' scornful gang said, "Good luck..."

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.